Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED| स्व.देशमुख प्रकरणातील आरोपींना शिक्षा करा परंतु वंजारी समाजास गुन्हेगारीच्या पिंजर्यात उभे करु नका-फुलचंद कराड

 बीड जिल्ह्यात मराठा-वंजारी समाज गुण्यागोविंदाने राहतो; परळी पॅटर्नच्या नावाखाली विनाकारण सर्वांना बदनाम करू नका


आपला ई पेपर परळी-वैजनाथ प्रतिनिधी

-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा. परंतु या घटनेच्या आडुन दोन जातींमध्ये वाद लावण्याचे कारस्थान रचले जात आहे. वंजारी समाजाला गुन्हेगारीच्या पिंजर्यात उभे करु नका. या प्रकरणाच्या आडुन ओबीसी व वंजारी या जातीवर कुणी बोलले तर ते चालणार नसल्याचा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांनी पत्रकार परिषदेत सामाजिक सलोख्यासाठी सर्व संघटना, प्रमुख नेत्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. 

 सध्या राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग येथील संतोष देशमुख खुन प्रकरणावरून राजकारण केले जात असल्याने याबाबत भगवान सेनेची भुमिका मांडताना भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या परंतु असे होताना दिसत नाही. कारण हे प्रकरण वेगळ्या कारणासाठी झालेले असुन काहीजण मराठा-वंजारी असा वाद लावण्यात गुंतले आहेत. आ.सुरेश धस यांना मोठे करण्यात दैवत आदरणीय मुंडे साहेब व पंडितअण्णा यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्हाला नेहमी वंजारीसह ओबीसी समाजाने निवडणुकीसह इतर वेळी साथ दिलेली आहे. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वंजारी, मराठा व ओबीसी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. देशमुख प्रकरणा बाबत विधानसभेत आवाज उठवायला हवा. केवळ आका, बोका, मुन्नी असे विचित्र बोलत आहात. आ.धस आपण कराड आडनाव, परळी शहर, वंजारी समाज, ओबीसी यांना या प्रकरणात जोडु नका. कारण परळी हे ज्यातिर्लिंगाचे क्षेत्र असल्याने येणार्या भाविकांवर परिणाम होत आहे. जरांगे पाटील तरी मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मी ही वंजारी समाजाच्या एन. टी २% आरक्षणा बाबत लढतोय. मनो हरज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. भगवान सेनेने ही मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. ओबिसी व वंजारी या जातीवर कोणी बोलत असतील तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा फुलचंदराव कराड यांनी या पत्रकार परिषदेतुन दिला आहे.  या वेळी पाटलाला मुंडे. माऊली फड ,भाऊसाहेब डीघोळे, रवि कराड यांच्या सह कार्यकते उपस्थित होते. 

@@@@@

सर्व पुढार्यांनी बीडला बैठक घ्यावी

 मस्साजोग प्रकरणावरून काहीजण परळी पॅटर्न म्हणत आहेत. यामुळे तमाम परळीकरांची बदनामी होत आहे. आरोपींचे नाव घ्या व त्यांना जे काय करायचे ते करा. या प्रकरणावरून सामाजिक वातावरण दुषित करणार्यांचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी प्रमुख नेत्यांनी बीड येथे बैठक घ्यावी. यासाठी आपण सर्व प्रमुख नेत्यांची भेट लवकरच घेणार असल्याचे फुलचंदराव कराड यांनी सांगितले.

@@@@@@@@

बीड जिल्ह्यात मराठा-वंजारी समाज गुण्यागोविंदाने राहतात

बीड जिल्ह्यात मराठा वंजारी समाज गुण्यागोविंदाने राहतो. बीड जिल्ह्यात कधीही मराठा विरुद्ध वंजारी अशी दंगल झाली का? निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. निवडणूक झाली की सर्वांनी एकोप्याने राहायचे असते. परंतु काही जण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत व मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु भगवान सेना हे षडयंत्र म्हणून पाडणार असल्याचेही भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यावेळी म्हणाले.