आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी
येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफण पब्लिक स्कूल मधील इयत्ता आठवीत अध्ययनरत ओजस अनिल कुलकर्णी या विद्यार्थ्याची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर वृत्त असे की,बेल फांऊडेशन आणि भवरलाल जैन फांऊडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये प्रथम पात्रता परीक्षा, त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमधून गुणवान विद्यार्थ्यांची निवड केली जाते.या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन मार्फत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येते. शिवाय, या बाल वैज्ञानिकांना इस्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्रा येथे अभ्यास सहलीला जाण्याची संधी मिळते.ओजस अनिल कुलकर्णी या वर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातून त्याच्या इयत्तेतून तिसऱ्या क्रमांकाला आला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंदफणा पब्लिक स्कूल द्वारे ओजस आणि त्याच्या वडिलांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ओजसने गेल्या वर्षी एक मार्क कमी मिळाल्यामुळे माझी ही संधी हुकली होती यावर्षी मी अतिशय मेहनत करून माझ्या इयतेत राज्यात तिसरे स्थान मिळवले आहे. ओजस चे वडील अनिल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपणही कुठल्याही क्षेत्रात चांगले नाव कमवून आपल्या पालकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी. ज्याप्रमाणे माझा व माझ्या मुलाचा या ठिकाणी गौरव करण्यात आला तसेच तुमच्याही पालकांना तुम्ही केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी शाळेत बोलवावे असे त्यांनी आवाहन केले.
या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, उपाध्यक्ष विरेन सोळंके, सचिव मंगलताई सोळंके, प्राचार्य अन्वर शेख, विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र सवई, उपप्राचार्य राहुल कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी ओजस चे अभिनंदन केले आहे.
Social Plugin