Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस : खा.बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

 


अपहरण प्रकरणाची 'सीबीआय' मार्फत चौकशी करण्याची मागणी

आपला ई पेपर /Online 

केज खून,मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले.