भव्य ग्रंथदिंडीने हालगे गार्डन येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ
परळी प्रतिनिधी
समोर बसलेल्या शिष्यवृंदाची मानसिकता, ऐकण्याची व आचरण करण्याची क्षमता ओळखून त्या शिष्यांना समजेल असे ज्ञान देणारेच खरे गुरु असुन अशा गुरु कडून मिळालेल्या ज्ञानातुन नम्र शिष्य घडत असतात असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे माताजींच्या श्री शिवमहापुराण कथेस बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला.
परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होत आहे.या कथेचे पहिले पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी गुरु शिष्यामध्ये नाते कसे असावे हे सविस्तरपणे सांगितले.मजबुरीत माणसाच्या अंगी असलेली विनम्रता ही खरी विनम्रता नसुन यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतरही जो माणुस लहानथोरांशी आपले विनम्रपणाचे वागणे कायम ठेवतो तोच खरा विनम्र व्यक्ती होय असे सांगुन शिवमहिमेवर सविस्तर विमोचन मांडले.पहिल्याच दिवशी कथामंडप भाविकांच्या उपस्थितीने भरुन गेला होता.
*भव्य ग्रंथदिंडीने कथेस प्रारंभ
Social Plugin