शरद पवार गटाच्या उमेदवाराची परळी मतदारसंघात गुंडशाही, तरीही विजय आमचाच |धनंजय मुंडे
अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न; मतदान केंद्रांवर तसेच नेते व कार्यकर्त्यांवर हल्ले
Online news/आपला ई पेपर परळी वैद्यनाथ
परळी विधानसभेची निवडणूक लागल्यापासून परळी गुंडशाही व दादागिरीचे राजकारण चालते असे म्हणून परळीच्या लोकांची बदनामी करणारे उमेदवार हेच स्वतः आज मतदानाच्या दिवशी गुंडशाही माजवताना दिसून आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या गुंडशाहीस जनतेने थारा दिला नसून, विजय आमचाच होईल, असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सहा पैकी किमान 5 जागा महायुती जिंकेल असा दावाही मुंडेंनी केला आहे.
घाटनांदुर, जवळगाव, मुरंबी आदी ठिकाणी तर अक्षरशः मतदान केंद्रांवरही हल्ले करून पोलिंग मशीन व्हीव्हीपॅट मशीन तोडफोड करून काही तासांसाठी मतदान बंद पाडले.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते तथा मजूर संस्थेचे जिल्हाध्यक्ष बन्सी अण्णा शिरसाठ यांच्या गाडीवर हल्ला केला, या हल्ल्यात बन्सी अण्णा शिरसाट बालमबाल बचावले.
याच जमावाने नवाबवाडी येथील बुथवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकवटलेल्या ग्रामस्थांनी त्यांना हुसकावून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, अंबाजोगाई तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ अवताडे यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांची गाडी सातेफळ फाटा येथे अडवून काही जणांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. धायगुडा पिंपळा येथील खाजा पटेल यांना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान अगदी पहिल्या दिवसापासून शांततेच्या स्वरूपात सुरू असलेली निवडणूक अखेरच्या टप्प्यात उमेदवार यांनी मात्र हिंसा करून अखेर परळीची बदनामी साधलीच.
दरम्यान सायंकाळ पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे 66 टक्के पेक्षा अधिक मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले असून आपला विजय निश्चित असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत धनंजय मुंडे हे आज दिवसभरात हल्ले झालेल्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी धायगुडा पिंपळा, अंबाजोगाई, घाटनांदुर, जवळगाव, आदी ठिकाणी भेटी देण्यासाठी गेले होते.
@*परळीत हल्ल्याप्रकरणी आयोगाकडे तक्रार | जनतेने पहावे गुंडगिरी, दहशत कोण करतंय #धनंजय मुंडे*
🔴👇👇👇
https://youtu.be/V4J5RVQY8PQ?si=sqPLiQTJqRkm-NC1
*परळीत...*
https://aplaepaper.blogspot.com/2024/11/pm-dm.html
*💫
*परळीतील निवडणुका संदर्भात धनंजय मुंडे ची पहिली प्रतिक्रिया*
https://youtu.be/bZ7cbDLd-ZY?si=C8l_pPPBHMvIgpcY
बीड जिल्ह्यात एकूण 22 लाख मतदान*
*परळी विधानसभा निवडणुकीत एकूण मतदार 337976 हक्क बजावणार*
https://youtu.be/akbTfr40hkA?si=s6ZwAQ3LthyIsvC4
*✨⭐मतदान केंद्र परिसरात लावण्यात आलेले नियम...व अटी*
🔴🔴🔴
https://youtu.be/8KeH2Jq75R0?si=oKcKUJ92wJeSsHUc
✨⭐
*🔴आपला ई पेपर*
*https://aplaepaper.blogspot.com*
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*



0 टिप्पण्या