Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PM | DM | मुंडे कुटुंबीयांनी सहकुटुंब सदस्य केले मतदान परळीत मुंडे परिवार अनेक वर्षानंतर...


 धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील जनतेला मतांचा टक्का वाढवण्याचे आवाहन




आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

परळी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह आपले जन्मगाव नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, काकी प्रज्ञाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे, ऍड.यशश्रीताई मुंडे, युवक नेते अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, नाथ्रा गावचे सरपंच अभय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, बी-बियाणे राज्य समितीचे सदस्य अतुल मुंडे, सुरेश मुंडे, सचिन मुंडे, रामेश्वर तात्या मुंडे यांसह मुंडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील जनतेला मतांचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या