आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी
विद्या भुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये शाळेचा सचिव मंगलताई सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. ८ नोव्हेंबर) इयत्ता पहिली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गुरुकुल इंग्लिश स्कूल, बीड चे आयोजन श्री. शितल सर्वज्ञ आणि एम.आय.टी. स्कूल, अंबाजोगाई चे प्राचार्य श्री. सागर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
क्रीडा महोत्सवाची सुरुवात भव्य ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी फैझाह शेख हिने सर्व खेळाडूंच्या वतीने क्रीडा शपथ दिली. या प्रसंगी क्रीडा शिक्षक श्री. पुरुषोत्तम सर यांनी मनोगत व्यक्त करताना खेळांचे महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुणे एम.आय.टी. स्कूल, अंबाजोगाई चे प्राचार्य सागर राऊत यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधी आणि महत्त्व पटवून देताना खेळातून संस्कार, निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना खेळातूनच निर्माण होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो असे प्रतिपादन केले.शाळेचे प्राचार्य श्री. अन्वर शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या क्रीडा विभागाने गेल्या वर्षभरात गाठलेल्या यशस्वी टप्प्यांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून रायफल शूटिंग हा नवीन खेळ शाळेत सुरू करण्याची घोषणा केली, जी उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात स्वीकारण्यात आली.या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा संचालक दीपक माने, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम सोळंके, वैशाली सोळंके, सचिन मंजुळे, शैक्षणिक विभाग प्रमुख धनंजय सोमवंशी, जीबी ऑगस्टन, सुनिता सुरवसे, अर्चना जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. शाळेचे क्रीडांगण विविध वयोगटातील स्पर्धकांच्या रंगतदार स्पर्धांनी गजबजून गेले होते. सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळत होते. पालकांनी खेळाडूंचे कौतुक केले.
या प्रसंगी शाळेचे उपप्राचार्य राहुल कदम, विशेष अतिथी म्हणून गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शितल सर्वज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये या क्रीडा महोत्सवाबद्दल मोठा उत्साह दिसून आला आणि विविध स्पर्धांमधून त्यांचे कौशल्य पाहायला मिळाले.
Social Plugin