Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED I परळी विधानसभा मतदारसंघात आज पहिल्याच दिवशी 49 फॉर्म विक्री

          

PARLI BEED 233 I परळी प्रतिनिधी

233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी आज दि. 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी  49 फॉर्म विक्री  झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सांगितले. तहसील परिसर कार्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, 233 परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 22 ऑक्टोबर पासून सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सांगितले की नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नमुना 2 ब सोबत नमुना 26 अशा प्रकारे बारा प्रकारची प्रपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.     

कोणत्याही उमेदवारांना आपला उमेदवारी फॉर्म दाखल करताना तीन गाड्यांची परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये  उमेदवारासह प्रत्येक गाडीत फक्त 4  व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना नाम निर्देशन पत्र दाखल करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे. तसेच अर्जाची प्राथमिक तपासणी ही करण्यात येणार आहे. 

   

 तहसील परिसर कार्यालया सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात येणारे वाहने आणि व्यक्तीवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी 3  पोलीस अधिकारी व 15 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र उपलब्ध करून देण्यात येतील. ओपन कॅटेगिरी साठी 10  हजार रुपये अनामत रक्कम तर एस. सी व एसटी कॅटेगिरीसाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे. 

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी 233 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने 40 लाख रुपये पर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आल्याचे सांगितले. त्याबरोबर निवडणूक काळात तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना सकाळी 11 ते 3 या वेळेत फॉर्म भरणे व इतर प्रक्रियेमुळे प्रवेश देण्यात येणार नाही. दुपारी 3  नंतर नागरिकांनी त्यांच्या कामासाठी तहसील कार्यालयात यावे असे आवाहनही अरविंद लाटकर यांनी केले आहे .यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते.