Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत महिला महाविद्यालयाचे तृतीय नॅक ' मूल्यमापन संपन्न

परळी वैजनाथ आपला ई पेपर प्रतिनिधी



येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे तिसरे 'नॅक ' मूल्यमापन संपन्न झाले . या तृतीय मूल्यमापनासाठी ' नॅक' च्या त्रिसदस्यीय समितीच्या तज्ज्ञांनी २२ व २३ आक्टोबर  रोजी महाविद्यालयास भेट दिली

या समितीत डॉ जितेनकुमार सोनी ( माजी कुलगुरु सौराष्ट्र विद्यापीठ गुजराथ .) हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ . वासंती ताटिमाकुला ( योगी वेन्नम्मा विद्यापीठ कडापा , आंध्रप्रदेश .) व डॉ . पार्वती रुद्रप्पा ( व्ही इ टी फर्स्ट ग्रेड  कॉलेज बेंगलोर , कर्नाटक . ) यांनी सदस्या म्हणून काम पाहिले . त्यांच्या या दोन दिवसीय  भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली गेली . त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य ,कार्यालयीन कामकाज  अशा विविध विभाग कार्याचे मूल्यमापन केले . त्यात प्रथम दिवशी महाविद्यालयात कार्यरत विविध शैक्षणिक विभागांना भेटी देऊन त्यांच्या कार्याचा अहवाल तपासून त्या त्या विभागाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यत् उन्नतीसाठी कांही उपयोगी सूचनाही दिल्या .

महाविद्यालयातील विविध मंडळे - भाषावाङ्मय मंडळ , विज्ञान मंडळ , सामाजिकशास्त्रे मंडळ ,  विद्यार्थिनी कल्याण विभागासह महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध क्लब कार्यांचीही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली . याबरोबरच महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थिनी मेळावा , पालक मेळावा घेऊन यांत पालक व माजी विद्यार्थिनींशीही या कमिटीने संवाद साधला . तसेच सध्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींची त्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे मनोगत ऐकून घेतले . प्रथम दिनी सायंकाळी पाच ते सात या कालावधी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे विविध गुणदर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . त्यात अनेक कलावंत विद्यार्थिनींनी या  समितीसमोर आपल्या विविध कलागुणांचे आविष्कारण करून दाखविले .   

या पुनर्मूल्यमापन प्रक्रियेसाठी महाविद्यालयाने नेमलेल्या समितीत प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक  म्हणून प्रा डॉ शिवनारायण वाघमारे यांनी काम पाहिले .

या मूल्यमापनकार्याच्या यशस्वितेसाठी  महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली .