आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
बीड मागील वर्षभरापासून अनेक मोठे लोक माझ्या मागे लागले असून माझे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी अभिमन्यू प्रमाणे मला चक्रव्यूहामध्ये गाठण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अर्जुनाचेच दुसरे नाव असलेला मी धनंजय आहे; मी चक्रव्यूहात सापडणार नाही, माझ्या पाठीशी माझ्या जनतेचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत माझ्या जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझा अभिमन्यू कोणीही करू शकत नाही असे उद्गार आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना काढले आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघात सह बीड जिल्ह्यातील विविध भागातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी कामानिमित्त छत्रपती संभाजी नगर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी व विद्यार्थ्यांशी आज धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजी नगर शहरातील लेमन ट्री हॉटेलमध्ये आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Social Plugin