परळीतील डोंगर तुकाई देवीचे धनंजय मुंडेंनी दर्शन घेऊन नाथ प्रतिष्ठान आयोजित खिचडी प्रसाद वाटपासह,स्वतः खिचडी बनवायलाही केली मदत
आपला ई पेपर परळी वैद्यनाथ
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नवरात्रनिमित परळी वैद्यनाथ शहरातील डोंगर तुकाई देवीचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य व संपन्नता नांदू दे, अशी प्रार्थना यावेळी मुडेंनी देवीच्या चरणी केली.
धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण नवरात्रात डोंगर तुकाई परिसरात भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमात आज धनंजय मुंडे यांनी देखील सहभाग घेतला.
धनंजय मुंडे यांनी स्वतः खिचडी बनवण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांनी भाविकांना खिचडी वाटपही केले. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, अनंत इंगळे, जितेंद्र नव्हाडे, रमेश बुद्रे, महावीर महालिंगे, ओम वाघमारे, पप्पूशेटे, रंगनाथ सावजी, अक्षय गायकवाड, पंकज कोथळकर, भूषण आंबेकर, नितीन देशपांडे, वैजनाथ सोनटक्के, शिवा सोरडगे, दत्ता घुले, हनुमान गित्ते, प्रशांत पोहनेरकर, राज लटपटे, शिरीष राजूरकर, यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षांपासून अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे. पहाटे साडेपाच वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रसाद वाटप सुरु असते. द्वितीया ते सप्तमी पर्यंत तांदूळ खिचडी केली जाते, यासाठी २५ ते ३० क्विंटल तांदूळ लागतो. तर अष्टमी ला सुमारे ७ क्विंटल साबुदाणा खिचडी करण्याचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी ५०० किलो मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून वाटले जाणार असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे.
Social Plugin