Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कै.ल.ता.साखरे गुरुजींचे मोठे योगदान-ॲड.हरिभाऊ गुट्टे

33 व्या स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


 परळी शहरातील सर्वात जुन्या असलेल्या वैद्यनाथ विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक कै.ल.ता.साखरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर मेहनत केली असुन त्यांच्या या कार्यामुळे आज अनेकजण शिक्षण घेवुन उच्च पदावर पोंहचले आहेत.त्यांचे हे कार्य कै.ल.ता.साखरे गुरुजी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांची मुले राजेश व ॲड.रमेश साखरे पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन परळी  वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड.हरिभाऊ गुट्टे यांनी केले.

 वैद्यनाथ विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक कै.ल.ता.साखरे यांच्या 33 व्या पुण्यस्मरणानिमीत्त वैद्यनाथ विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मंगळवार दि.17 सप्टेंबर रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे उपमुख्याध्यापक हंगिरगेकर सर तर प्रमुख अतिथी म्हणुन वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक, परळी वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड.हरिभाऊ गुट्टे,दै.दिव्यमराठी तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव, सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष यशवंत चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक हरीश देशमुख,सुनील देशमुख,प्राथमिक विद्यालायाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम,सूर्यवंशी सर यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ॲड.गुट्टे म्हणाले की,कै.ल.ता.साखरे गुरुजींनी पोहनेर सारख्या ग्रामीण भागातून परळीत येत वैद्यनाथ विद्यालयासारख्या संस्थेत असंख्य विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देत शिक्षणाचा पाया मजबूत केला.त्याकाळी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार मर्यादीत असायचा.साखर गुरुजींनी अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणले.अध्यक्षीय समारोपात शाळेचे उपमुख्याध्यापक  उपमुख्याध्यापक हंगिरगेकर यांनी साखरे गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका प्रतिभा देशमुख,संचलन किरवले सर तर 

आभार प्रदर्शन राजेश साखरे यांनी केले.

@@@@@

*होतकरु विद्यार्थ्यांसाठी कार्य करु- ॲड.साखरे*

 आमचे वडील कै.ल.ता.साखरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त यावर्षी प्रथमच शालेय स्पर्धा घेण्यात आल्या.आम्ही पाच विद्यार्थ्यांना गणवेश,शैक्षणिक साहित्य,फिस च्या माध्यमातुन सहकार्य करत असुन भविष्यात कै.ल.ता.साखरे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा मनोदय कै.ल.ता साखरे गुरुजी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड.रमेश साखरे यांनी या कार्यक्रम घेण्यामागची भूमिका मांडताना व्यक्त केली.

@@@@@

*हे विद्यार्थी ठरले बक्षीसाचे मानकरी*

कै.ल.ता.साखरे स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या श्रद्धा सूर्यवंशी,मैथिली कुकर,पंकजा संघई,श्रेया शिवगण,रोहन संघई,विद्या खांबे,सानिका गालफाडे,सृष्टी साखरे,दुर्गा नागराळे,शुभ्रा बोर्डे,मुग्धा देशमुख,शिवम आवटे,इस्माईल खान,अक्षरा रेवनवार,अक्षरा समशेट्टे,पूर्वी फडकरी,श्रद्धा सूर्यवंशी,आदिती गुंडाळे,श्रुती नागरगोजे, रुद्राक्ष पिटलेवाड या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या