Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed | मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला ही चूक का?-माजी आ.डी.के.देशमुख

राज्याच्या मानाने मराठवाडा सर्वच बाबतीत मागासलेला


मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचा स्मृती अभिवादन कार्यक्रम 


आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी

मराठवाडा महाराष्ट्र सामील होऊन चूक केली का काय असा प्रश्न मराठवाड्यातील जनतेला निर्माण असून राज्यातील सरकार मराठवाड्याच्या विकासाच्या पोकळ घोषणा करीन उर्वरित महाराष्ट्राकरिता विकास करत असल्याचे सरकारच्या धोरणावरून दिसून आले आहे. मराठवाड्याचा विकास उर्वरित राज्याच्या मानाने कमी झाला असल्याचे  प्रतिपादन संभाजी नगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.डि.के.देशमुख यांनी केले. मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी तथा बीड जिल्ह्याची माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिस्थळावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.यावेळी गावातील ज्येष्ठ कॉ.बाबुराव देशमुख, गावचे माजी सरपंच कॉ.सुदामदादा देशमुख,विद्यमान सरपंच,उपसरपंच  आदींसह अनेक प्रमुख उपस्थिती होती.


या प्रसंगी बोलताना देशमुख यांनी मराठवाड्या बाबत सरकारची असलेली उदासीन भूमिका यावर परखड मत व्यक्त करत निजामाच्या जोखडीतून मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला ही मोठी चुकी केली का काय? असे मत आता शासनाच्या मराठवाड्याच्या विकासाबद्दल असलेल्या धोरणावरून जनतेत निर्माण झालेली आहे. राज्यपालाच्या अखत्यारीत असलेला मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा वैज्ञानिक विकास महामंडळ हे राज्यपालाच्या

अधिकारातून काढून केवळ विकास महामंडळ राबवून सत्ताधाऱ्यांनी ते स्वतःच्या हातात घेतलेले आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या मानाने  शिक्षण,आरोग्य, रोजगार, व्यवसाय, औद्योगीकरण आदी सर्वच बाबतीत मराठवाडा हा मागासलेला भाग असून शासनकर्ते केवळ 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याच्या विकासाबद्दल, अनुशेष पूर्ण करण्याच्या आश्वासनांची बरसात करतात मात्र त्याची अंमलबजावणीच केली जात नाही.मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मराठवाड्यातील युवकांनी आता संघर्षाचा पावित्रा घेत  मराठवाड्याचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे मोहा हे गाव प्रेरणेचे तीर्थ क्षेत्र बनलेले असून मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ,आणीबाणीची लढाई आणि विद्यमान काळात शेती, शेतकरी, रोजगार व अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध सतत संघर्षाची प्रेरणा देणारा गाव असा उल्लेख करीत आजच्या ढासाळलेल्या नीतीमूल्य राजकारणामध्ये तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ व्यक्ती निर्माण करणाऱ्या याच मोहा गावाच्या भूमीतून मराठवाड्याच्या विकासाचा संघर्ष उभा करावा लागेल असे ही ते म्हणाले.

या स्मृती अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण अंबाजोगाईचे कॉ.एड.अजय बुरांडे यांनी करत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाप्रमाणेच मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम असून याचा शालेय अभ्यासक्रमात उल्लेख नसल्याची खंत व्यक्त करीत देशाच्या स्वातंत्र्याची 78 वर्ष, संविधान निर्मीतीची 75 वर्ष आणि मराठवाडा मुक्ती दिनाचा 76 वर्ष साजरा करत असताना मागील वर्षी 17 सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठमोठ्या हजारो कोटीच्या घोषणा केल्या मात्र अंमलबजावणी न झाल्याने 

मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण झालेला नाही असे असे ही त्यांनी सांगितले


या स्मृती अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देशमुख तर आभार ब्रम्हानंद देशमुख यांनी केले.याप्रसंगी यावेळी गावातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या