Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत असा भरा अर्ज, येणारे प्रश्न


आपला ई पेपर |mukhymantri | ladki bahan |


जनजागृती 👧 

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न
दरम्यान या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

महिला, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहतील. फक्त राज्यातीलच महिलांना याचा लाभ मिळणार आहे. लग्नापूर्वी परराज्यात असणाऱ्या अन राज्यातील पुरुषासोबत लग्न करणाऱ्या महिला सुद्धा यासाठी पात्र राहतील. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

महिलांच्या सोयीसाठी राज्य शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी एक ॲप्लिकेशन देखील डेव्हलप करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण मोबाईलचा वापर करून या योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मोबाईल ॲप्लिकेशन वरून अर्ज कसा करायचा

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे हेतू नारीशक्ती दूत हे ॲप्लीकेशन डेव्हलप केले आहे. हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंकवर जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे.

एकदा मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले की तुम्ही या योजनेसाठी सहजतेने अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घ्यावे लागणार आहे. यासाठी मोबाईलनंबर, OTP अन term and condition वर क्लिक करून लॉगिन करायचे आहे. यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा हा पर्याय दिसणार आहे.

यात तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. एवढी माहिती भरल्यानंतर तुमची प्रोफाइल अपडेट होणार आहे.

प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला नारीशक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या पर्यायावर क्लिक करा. मग यानंतर तुम्हाला लोकेशन ऑन करण्यास सांगितले जाईल. यानंतर स्क्रीनवर या योजनेचा फॉर्म उघडेल.

हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. येथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात की नाही याची माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर बँकेचा तपशील भरावा लागणार आहे.

यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक्सेप्ट डिक्लेरेशन डिस्क्लेमर या पर्यायावर क्लिक करून या योजनेच्या अटी आणि शर्ती Accept करायच्या आहेत.

त्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचा, कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाली आहेत की नाही याची खात्री करा मग सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.

१) फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 5MB  पेक्षा कमी असावी
२) नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार
३) काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही
४) फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा


५) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा
६) अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे
७) आता फक्त तुम्हाला आधार कार्ड वरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे ॲप अपडेट करा
८) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल
९) ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही
१०) जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा
११) पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त ippb चे अकाउंट चालते
१२) अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येईल
१३) शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा


१४) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे
१५) बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे

१६) सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
१७) आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा
१८) सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही
१९) फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता
२०) ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा
२१) डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही
२२) फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता
२४) फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिला असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही
२५) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा
२६) बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे ॲप वरती upload करणे मेंदेटरी नाही
२७) महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता त्यासाठी ॲप अपडेट करा
२८) फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे, त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता
२९) उत्पन्नाचा दाखला अपलोड करनार असेल तर 2024 25 असावा
३०) जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर अपलोड करू शकता
३१) डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल
३२) पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही ( पासबुक आणि पतीचे कागदपत्र)
३३) संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही
३४) हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका
३५) एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही
३६) कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही
३७) लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका
३८) आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता
३९) नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला किवा शाळेचा दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही
४०) रेशन कार्ड ऑनलाइन ची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकली रेशन कार्ड चा फोटो काढून अपलोड करा

सौजन्य....
*बाजीराव धर्माधिकारी*
*शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी नगराध्यक्ष,परळी -वै.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या