Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे इयत्ता दहवी CBSE बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ  येथील विद्यार्थ्यांनी परत आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवत सर्व पंचक्रोशित अतुलनिय तसेच प्रशंसनीय असा किर्तीमान २०२३-२०२४ सी बी एस सी बोर्ड परीक्षेत १०० % निकाल देऊन स्थापित करत, संपूर्ण परिसराला थक्क केले आहे.
या वर्षी एकूण ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी ४ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
यामध्ये अजिंक्य देशमुख शाळेत प्रथम येत त्याने ९७.४०% गुण मिळवले आहेत, तर   आर्या नावंदरने ९४.८% गुण घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे, याचबरोबर सोमनाथ मुंडे याने ९०.४%  गुण तर तपन शिंदे याने ९०% गुण संपादन करत तिसरा तसेच चौथा क्रमांक मिळवला आहे.
हा उल्लेखनीय आणि प्रशंसनीय निकाल म्हणजे शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आणि साहजिकच विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापकीय अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते  तसेच आमचे मार्गदर्शक श्री.किरण गित्ते साहेब सचिव त्रिपुरा सरकार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे   अभिनंदन केले, तसेच  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या