Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CBSE | दहावी बोर्ड परीक्षेत पोदार लर्न स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात केली ऐतिहासिक कामगिरी






मराठी विभाग प्रमुख दिनेश जयतपाळ यांचा शाळेच्या वतीने अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला..

100 टक्के निकालाची परंपरा कायम

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

परळी येथील राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या 2023-2024 CBSE | सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कौतुकास्पद, मराठी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली आहे.

नुकत्याच  मार्च- एप्रिल 2023-2024 दरम्यान CBSE |सीबीएसई कडून दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

CBSE |दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत पोदार लर्न स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये मानसी तिवारी, नवनाथ गव्हाणे, रचना खंदारे, सपना लाहोरकर, श्रावणी अय्या, स्नेहल कदम ,शर्वरी पवार आणि तन्मय अहिरे यांचा समावेश आहे.तसेच 90 ते 100 या दरम्यान मराठी विषयात 54 विद्यार्थ्यांनी गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविले. या विशेष कामगिरीबद्दल मराठी विभाग प्रमुख दिनेश जयतपाळ यांचा शाळेच्या वतीने अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे याही वर्षीशाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे.

या घवघवीत यश मिळविल्यामुळे  शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील, परीक्षा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुठ्ठे  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या