Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बर्दापूरचे लिंगायत समाजातील जेष्ठ सदाशिव अप्पाबाबाजी चिपडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 

डॉ. विजय चिपडे यांना पितृशोक 

आपला ई पेपर|परळी |प्रतिनिधी 

आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रहिवासी असलेले लिंगायत समाजातील जेष्ठ सदाशिव अप्पाबाबाजी चिपडे वय 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन अंत्यविधी आज दि.7 मंगळवार रोजी सायंकाळी 5.00 वा. बर्दापूर येथील लिंगायत स्मशानभुमीत  होईल.

 मागील अनेक वर्षांपूर्वी 1990 च्यां कार्य काळात परळी येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांनी बरीच वर्ष कार्यरत होते. प्रशासकीय सेवा सोबतच सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेऊन सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्  त्यांची ओळख होती. परळी तहसील मध्ये नौकरी केली व उर्वरीत जीवन सहकुटुंब सहपरिवार बर्दापूर येथे व्यतीत केले.

त्यांच्या निधनाने परळी शहरासह तालूक्यातील लिंगायत समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले डॉ. विजय चिपडे, अरुण चिपडे ,सुना,नातवडे असून ते लातूर येथील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन मेंदू /मणका विकार तज्ञ/डॉ. हर्षद चिपडे यांचे ते आजोबा होते त्यांचा दुःखात आपला ई पेपर परिवार सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या