Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बजरंग सोनवणे यांची सीट धोक्यात राजकीय वर्तुळात चंदन चोरांची चर्चा

राष्ट्रवादी नगरसेवकाची चंदन तस्करी उघडकीस आली, अन शरदचंद्र पवारांनी आष्टीची सभाच रद्द केली..!


आपला ई पेपर बीड प्रतिनिधी 

सुमारे दोन कोटी रुपयाची चंदन तस्करीची चोरी केज पोलिसांनी पकडली. त्यात बीड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवणारे बजरंग सोनवणे यांचे निकटवर्ति नव्हे तर प्रचारात प्रमुख असलेले बालाजी जाधव नगरसेवक केज तथा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर राज्यभरत खळबळ उडाली. या घटनेची गंभीर दखल दस्तूर खुद शरदचंद्र पवारांनी घेतली आणि स्वत:च अंतरमुख होऊन सोनवणे यांच्या प्रचारासाठी दिलेली सभा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होताना दिसते. एवढेच नव्हे तर प्रकरण पुढे आल्यानंतर फार मोठा फटका सोनवणे यांना बसू शकतो. 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केजला दोन कोटी रुपयाचे चंदन तस्करी पोलिसांनी कारवाई करून मुद्दे माल शिवाय आरोपी सह पकडल्यानंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. विशेष म्हणजे महावीकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या कर्म भूमीतच चंदन चोरी प्रकार उघडा पडला. यातले आरोपी बालाजी जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे नगरसेवक आणि बजरंग सोनवणे यांचे निकटवर्ति म्हणून ओळखले जातात. दोन्ही आरोपी सोनवणे यांच्या प्रचारात खुले आम फिरत होते. ज्याचे छायाचित्र देखील सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले. उमेदवारी मिळाल्या नंतर किसान पुत्र नावाने उपाधी लाऊन सोनवणे यांनी घेतली खरी मात्र चंदन चोरी मुळे किसान पुत्राचा खरा चेहरा समोर आला. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला अंतरमुख करायला लावणारी सदर घटना गंभीर म्हणावी लागेल. असे उमेदवार बीडच्या जनतेच्या समोर साहेबांनी का लादले हा सवाल आता मतदारच करू लागले. दरम्यान बजरंग सोनवणे यांच्या निवडणूक प्रचारासाठी काल आष्टीत शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा पूर्व नियोजित होती. मात्र एक दिवस अगोदर उमेदवाराच्या गावात त्यातही कार्यकर्त्यांनी केलेल्या उद्योग समोर आला. कदाचित स्वत:च पवार साहेबांनी अंतरमुख होऊन सभा रद्द केली जात असावी असे तर्क वितर्क काढले जात आहेत. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर रद्द झालेली सभा घेण्याची वेळ आली खरी पण, पवार साहेबांच्या सभा रद्द होण्यामागचे प्रमुख कारण चंदन तस्करीच असल्याचे बोलले जाते.  

रमेश अडसकरांचा हल्ला, उमेदवारांची औका.. ओळखा..!

या लोकसभा मतदार संघात पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात महावीकास आघाडीकडून निवडणुकीत उभे असलेले बजरंग सोनवणे यांच्या निकटवर्ति यांचा दोन कोटी रुपयांच्या चंदन तस्करीत असलेला सहभाग पुढे आल्यानंतर एवढी मोठी तस्करी करणाऱ्यासाठी शरदचंद्र पवार पुढे येतील कसे ?  आशा माणसाचा प्रचार आपल्याला सोबत नाही हे लक्षात आल्या बरोबरच आष्टीची सभा रद्द केल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते रमेश आडसकर यांनी दिली.  जिल्ह्यातील मतदार जनतेने उमेदवार कसे आहेत हे आता ओळखणे महत्वाचे ..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या