Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत भिषण अपघातात मोटार सायकल स्वार व पाठीमागे बसलेले वयोवृद्ध दोघांचा जागीच मृत्यू

 परळीत भिषण अपघातात मोटार सायकल स्वार व पाठीमागे बसलेले वयोवृद्ध दोघांचा जागीच मृत्यू 

अपघातातील व्यक्ती परळी शहरातील बरकत नगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे..






अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 जागीच ठार*

आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी

औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळील उड्डाणपूला जवळील चेंबरी रेस्ट हाऊस जवळ  अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बरकत नगर येथील रहिवासी असलेले  सय्यद अब्दुल गफ्फार (वय 60) व अजय जमुना चौधरी (वय 45) हे आपल्या मोटारसायकल वरून  परळीकडे येत असताना औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात असलेल्या उड्डाणपूलाजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.या धडकेत दोन्ही इसम वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती कळताच परळी उपजिल्हा रूग्णालयाची 108 रुग्णवाहिका व डॉ.अमोल चाटे यांनी घटना स्थळी धाव घेऊन मयताना परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले.


सविस्तर बातमी थोड्या वेळात..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या