Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आयपीएल 2024 केकेआर टिमचा चा विजय



KKR विजेत्या संघाला मिळणार कोट्यावधीच बक्षीस 

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. कोलकाता (KKR) आणि हैदराबाद (SRH) हे IPL 2024 चे दोन सर्वोत्तम संघ होते. पॉइंट टेबलमध्ये टॉप-2 वर होता. निकराच्या लढतीची अपेक्षा होती. पण केकेआरने इतिहासातील सर्वात एकतर्फी फायनल केली. श्रेयस अय्यरचा संघ KKR ने प्रथम SRH ला IPL फायनलमध्ये फक्त 113 धावांवर रोखले. यानंतर 10.3 षटकांत 8 गडी राखून सामना जिंकला. केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झाला

अंतिम सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला तसेच कोट्यावीचे बक्षीस,.

KKR विजेत्या संघाला मिळणार कोट्यावधीच बक्षीस

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्घेतील उपविजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती, ती तशीच ठेवण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात झाले अनेक विक्रम

आयपीएल 2024 चा हंगाम शानदार होता. या वर्षी असे काही विक्रम झाले आहेत जे भविष्यात मोडणे खूप कठीण आहे. T20 सामन्यातील सर्वाधिक षटकारांव्यतिरिक्त, यामध्ये सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मोठा पाठलाग, सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्यासारखे अनेक मोठे विक्रम देखील समाविष्ट आहेत. या मोसमातील विक्रम आणखी मोडणे कठीण आहे कारण पुढील वर्षी एक मेगा लिलाव आहे. यामुळे सर्व संघात बदल होणार आहेत.

आयपीएलमध्ये खर्च केलेल्या रकमेबाबत लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतर अनेक पुरस्कारही दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड आदी पुरस्कारांचा समावेश आहे. जाणून घेवूयात या पारितोषिकांची किती आहेत…आयपीएल ऑरेंज कॅप : हा पुरस्कार संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जातो. या पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला 10 लाख रूपयांचे बक्षीस दिले जाते.

फेअर प्ले अवॉर्ड : हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक शिस्तीने खेळलेल्या आणि कोणताही गैरवर्तन न केलेल्या संघाला दिला जातो. या पुरस्काराला 10 लाख रूपयांचे बक्षीस दिले जाते.

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर : हा पुरस्कार आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. या पुरस्कारासाठी खेळाडूला 10 लाख रूपयांचे बक्षीस दिले जाते.

आयपीएल पर्पल कॅप : संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज हा या पुरस्काराचा विजेता आहे. पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला 10 लाख रूपयांचे बक्षीस दिल जाते.

इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन : हा पुरस्कार हंगामातील उदयोन्मुख खेळाडूला दिला जातो. विजेत्याला 10 लाख रुपयांचा धनादेश दिला जाईल. हा पुरस्कार पटकवणाऱ्या खेळाडूला 10 लाख रूपयांचे बक्षीस दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या