Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न, माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी

 


सिंदफणा काठच्या गावांना लाभ; ग्रामस्थांच्या मागणीला यश, पालकमंत्र्यांचे मानले आभार

माजलगाव (प्रतिनिधी) - पिण्याला पाणी नाही, जनावरांना पाण्याची अडचण, ऊस वाळतोय त्यामुळे पालकमंत्री महोदय, सिंदफणा नदी पात्रात माजलगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करा; अशा पद्धतीची विनंती माजलगाव तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले आणि अवघ्या दोन दिवसातच सिंदफणा नदीपात्रात माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. 

माजलगाव तालुक्यातील शिंपे टाकळी, रोशन पुरी, नागडगाव, सांडस चिंचोली, मनूर, लुकेगाव, दिपेगाव आदी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे माजलगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती. 

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने माजलगाव धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच धरणातून पुढे जाणाऱ्या रोशनपुरी बंधाऱ्यासह विविध गावांना मिळावयाच्या लाभाचा तातडीने विचार करून माजलगाव धरणातून पुढे पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या होत्या. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला असून, आज सकाळी प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले आहे. 

दरम्यान वरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्याचे पाणी, उभे पिके, आदींना या पाण्याचा लाभ होणार असून एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची वृत्ती लक्षात घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांकडून पालकमंत्री धनंजय मुंडे , प्रकाशदादा सोळंके यांसह संबंधित सर्वांचेच आभार व्यक्त केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या