Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची यादी जाहीर बीडमध्ये बजरंग सोनवणेंना संधी

 आपला ई पेपर परळी 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली.

बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. पैकी, ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावे आघाडीवर होते. बजरंग सोनवणे यांनी २०१९ ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या