Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगाव येथे सिंदफणा शाळेत लोकनेते सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेचे पहिले पुष्प उत्साहात

 


शिक्षकांनी समाजशील व्हावे: हेरंब कुलकर्णी

आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी


 शिक्षकांनी समाजातील प्रश्न समजून  त्यावर आपल्याला जमेल त्या पद्धतीने काम करत समाजशील व्हावे, असे मत प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व वक्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूल द्वारा सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पामध्ये बोलत होते. ' 'शिक्षकांसाठी साने गुरुजी' या विषयावर त्यांनी  शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शहरातील ख्यातनाम कवी प्रभाकर साळेगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर गढी येथील शिवशारदा पब्लिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन चितृदास पिल्लई व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सेवा दलाच्या ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. सुलभा देशमुख देखील यावेळी उपस्थित होत्या. 

व्याख्यानमालेची सुरुवात शाळेचे संगीत शिक्षक चैतन्य जाधव व प्रवीण तिवारी यांनी गायलेल्या ' खरा तो एकची धर्म ' या गीताने झाली. साने गुरुजी आज देखील महाराष्ट्राला आकर्षित करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना लाभलेल्या अल्पायुषात त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. गुरुजी हे विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व होते, म्हणून सर्व शिक्षकांनी देखील मुलांशी प्रेमाने वागण्याची शिकवण आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य अन्वर शेख व डॉ. वरूण यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी प्रभाकर साळेगावकर म्हणाले की, साने गुरूजी समजणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षक हा उत्तम साहित्यिक असतो. त्याने समाजाला काहीतरी देणे गरजेचे आहे. साने गुरूजींनी केलेल्या महान कार्यासाठी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारत रत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

व्याख्यानमालेच्या सकाळच्या सत्रात सिंदफणा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हेरंब कुलकर्णी यांनी संवाद साधला. आज विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे ते यावेळी म्हणाले. पहिल्या सत्राचे अध्यक्षीय स्थान शाळेच्या समन्वयक नीला देशमुख यांनी भूषविले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक ज्ञानेश्वर कुंडकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुनीता सुरवसे यांनी करून दिला. आभार शाळेचे उपप्राचार्य राहुल कदम व सखाराम जोशी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय उपक्रम प्रमुख जिजाराम गडाख, सांस्कृतिक विभाग,शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

*परळीचा साईराज केंद्रे झी मराठीच्या प्रसिध्द मालिकेत झळकणार*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

आता परळीत सुद्धा उपलब्ध..

*🔴💥👇👇👇🫀
*सुपर स्पेशालिस्ट,*
*डॉ.हर्षद चिपडे*
*(Mch.Neurosurgery, AIIMS New Delhi)*

*

यापुढेही प्रत्येक महिन्याच्या..
*दुसऱ्या व चौथ्या शनिवारी डॉ.हर्षद चिपडे हे 'अनन्या हॉस्पिटल', परळी* येथे नियमित उपलब्ध राहतील.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :
*7741997019*

(Advt.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या