Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीचा साईराज केंद्रे झी मराठीच्या प्रसिध्द मालिकेत झळकणार

आपला ई पेपर परळी 



Authorised Zee Marathi


'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर बनवलेल्या रिलमुळे साईराज केंद्रे हा चर्चेत आला होता. विशेषतः या गाण्यावरील त्याचे गोंडस हाव-भाव लोकांना लक्षात राहिले. 

परळीचे नाव भारतभर प्रसिद्ध करणारा, परळीतील एक चिमुकला कलाकार आता हाच साईराज झी मराठी वाहिनीवरील मालिका 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये झळकणार आहे. यात अप्पीच्या मुलाची भूमिका साईराज निभावणार आहे. या भागाचा प्रोमो आला असून हा भाग 1 मे पासून दररोज झी मराठी या चॅनलवर  संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्यात लडिवाळ बोलणारा आणि क्यूट हावभाव करणाऱ्या साईराज केंद्रेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या गाण्यामुळे साईराजला प्रसिद्धी मिळाली. आता साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे.

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय अशा 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत साईराजची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये साईराजची झलक पाहायला मिळणार आहे. साईराज या मालिकेत अप्पी आणि अर्जुन यांचा लेक अमोल ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये या छोटा सिम्बाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत ७ वर्षांचा लीप दाखविण्यात येणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अप्पी तिच्या मुलासोबत उत्तराखंडमध्ये कलेक्टर म्हणून गेल्याचं दिसत आहे. तिथेच अर्जुनदेखील येत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. अप्पी तिच्या लेकासोबत मंदिरात पाया पडत असताना अमोल आणि अर्जुनची गाठभेट होते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. १ मेला महाराष्ट्र दिन विशेषनिमित्त मालिकेचा हा भाग प्रसारित केला जाणार आहे.


*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

आता परळीत सुद्धा उपलब्ध..

*🔴💥👇👇👇🫀
*सुपर स्पेशालिस्ट,*
*डॉ.हर्षद चिपडे*
*(Mch.Neurosurgery, AIIMS New Delhi)*

*शनिवार,दि.२७ एप्रिल २०२४* रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
या वेळेत परळी येथे रुग्णांच्या तपासणी करिता..
*अनन्या हॉस्पिटल,जुन्या कोर्टासमोर बस स्टँड जवळ परळी* येथे उपलब्ध आहेत.

यापुढेही प्रत्येक महिन्याच्या..
*दुसऱ्या व चौथ्या शनिवारी डॉ.हर्षद चिपडे हे 'अनन्या हॉस्पिटल', परळी* येथे नियमित उपलब्ध राहतील.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :
*7741997019*

(Advt.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या