Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाई पासून जवळच ग्रामीण भागात बिबट्याचा वावर, ग्रामस्थात भितीचे वातावरण

 आपला ई पेपर अंबाजोगाई 


अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या मांडवा, साकुड भागात  बिबट्याचे दर्शन झाले. मांडवा, साकुड रस्त्याच्या कडेला काही ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात बिबट्या दिसून आल्याच्या चर्चा होत होत्या मांडवा, साकुड रस्त्यावर चारचाकी वाहनातून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला बिबट्याचे दर्शन झाले. 

या बिबट्याचे छायाचित्र  हाती लागल्याने बिबट्याच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, याच भागात अर्धवट खाल्लेले प्राणी आढळून आले असून बिबट्यानेच त्याचा फडशा पाडला असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या परिसरातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी नागरिकांनी या भागातून प्रवास टाळावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या