Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक



महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त परळीत शोभायात्रा,मिरवणुक


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतिने गुरुवार दि.11एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शोभायात्रा व सायंकाळी चार वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येणार आहे.

 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती परळीच्या वतिने दि.11 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन याअंतर्गत  सकाळी नऊ वाजता संत सावतामाळी मंदिर येथुल शोभायात्रा काढण्यात येणार आहे.परळी शहरातील गोपाल टॉकीज,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट मार्गे ही शोभायात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या रेल्वेटेशन येथे समाप्त होईल.यानंतर सायंकाळी चार वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वाद्यांच्या गजरात संत सावता माळी मंदिर येथून काढण्यात येणार आहे.शोभायात्रा व मिरवणुकीत फुलेप्रेमी नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतिने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या