Apla epaper / परळी प्रतिनिधी
पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची नुकताच एक महिन्या पुर्वी संगीत क्षेत्रातील परीक्षा झाली होती. या अखिल भारतीय संगीत परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात भारतातील जवळपास सर्व राज्यांतीलच नव्हे तर परदेशातूनही सदस्य असलेल्या
भारतीय संगीताची कला, ज्याला पूर्वीच्या काळात राजदरबारात मान-सन्मान लाभलेल्या... संगीताची उन्नती हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संगीत क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारच्या परिक्षेत सतत सहभाग असतो.
पोदार स्कूलच्या 32 विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय संगीत परीक्षेत यश मिळवले आहे.यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांची नेत्रदिपक यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक पोदार लर्न स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.
Social Plugin