Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत जनसंवाद बैठकीला उसळला जनसागर

 


सरकारला विनंती खोटे गुन्हे दाखल करायचे थांबवा नाहीतर समाजाची लाट तुमच्या अंगावर येईल - मनोज जरांगे पाटील

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


 मराठा समाज बांधवांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे थांबवावेत अशी विनंती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना केली .नाहीतर मराठा समाजाची लाट तुमच्या अंगावर येईल असा गर्भित इशारा परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत जरांगे यांनी दिला. दरम्यान 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे समाजाची अंतिम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

     दि 20 मार्च रोजी रात्री मोंढा मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की परळीकरांनी संवाद बैठक नाहीतर महाराष्ट्रातील जनतेची बैठक लावल्याचे उपस्थित गर्दीवरून दिसत आहे

      सभेला सुरुवात करताना जंरागे पाटील यांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे बोलत असल्याचे सांगितले आता यापुढे मराठा समाजाने जिथे फायदा नाही तिथे काम करायचे नाही असे ठरवले पाहिजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर होत असलेल्या खोट्या गुन्ह्याबाबत बोलताना ते म्हणाले की हे गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय होऊ शकत नाही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचाही त्यांनी याप्रसंगी नाव न घेता उल्लेख केला कदाचित पालकमंत्र्यांना हे सर्व माहीत असावे किंवा त्यांच्या संगणमताने तर गुन्हे दाखल होत नाहीत ना असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला

    पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारने जो शब्द दिला तो पाळला नाही दहा टक्के आरक्षण समाजाला मान्य नसताना ते दिले सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही परंतु एक लक्षात ठेवा आचारसंहिता संपली की पुन्हा गाठ आमच्याशी आहे मी समाजाला मायबाप मानतो त्यामुळे स्वार्थासाठी समाजाशी कधी गद्दारी करणार नाही सरकारला आपला आक्रोश कळत नाही जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी समाजाचे ही एकजुट अशीच कायम ठेवा आपणाला न्यायाचा आणि सामाजिक लढा जिंकायचा आहे

    दरम्यान 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक होत असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल तर लवकरच 900 एकर वर मराठ्यांची भव्य सभा होईल असे हे ते म्हणाले लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गावातून फॉर्म भरणे हा समाजाचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करा आणि ते कुणाला करायचे हे 24 तारखेला सांगतो असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान या संवाद बैठकीला महिला व पुरुषांची प्रचंड गर्दी होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या