Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी येथील बचपन प्रि स्कुलच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

 


आपला ई पेपर/परळी /प्रतिनिधी




परळी शहरातील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले,   शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट बचपन स्कुल, यु के जी च्या विद्यार्थ्यांचा 2023-2024 चा पदवी (UKG) प्रदान सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

पोदार लर्न स्कूलच्या आवारात UKG पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख आतिथी ऑरर्किड इंटरनॅशनल स्कूल बेंगलोर शाळेच्या संचालिका मधुसिंग तसेच, शाळेच्या अकॅडमी डायरेक्टर बी.पी सिंग या मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

या पदवीदान समारंभ प्रसंगी पोदार शाळेचे प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील व पालक प्रतिनिधी म्हणून डॉ. दिनेश लोढा व परळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पालक हे उपस्थित होते.

या पदवीदान समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती देवीचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑरर्किड इंटरनॅशनल स्कूल बेंगलोर शाळेच्या संचालिका मधुसिंग यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या