Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वसंतनगर परिसरात तीस लाख लिटर साठवण क्षमतेच्या जलकुंभ युवकांच्या श्रमदानातून तयार

 आपला ई पेपर परळी 






परळी वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने  सात दिवशीय शिबिर '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास ''  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत संकल्पनावर घेऊन जल सक्षारता संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा , पर्यावरण आकलन आचरण आणि श्रमदानातून

एकशे पंचवीस युवक - युवतीच्या दोनशे पन्नास  हातानी , सात दिवस सलग  आठ तास श्रमदानतून  तासात 

अंधार खोळी  परिसर वनविभाग डोंगऱ्याच्या कुशीत हा जलकुंभ पाझर तलाव श्रमदान तयार केला . डोंगर दऱ्यातून दगड, माती , खोदकाम करत पाणी अडवण्यासाठीची माती -दगडाची पाळू पंधारा फुट भिंत उभी केली असून , युवक -युवतीनी एक एक करत सोळा हजार दगड - गोटे गोळा करून पाण्या आडवण्यासाठी तट भिंत श्रमदानातून उभा केली . मागच्या वर्षी हा बंधारा एन . एस . एस . वैद्यनाथ कॉलेज युवकांच्या श्रमदानातून बारा लाख लिटर क्षमतेचा केला होता . त्या पाणीचा उपयोग वन्य प्राणी,  

पशुपक्षी , पाळीव गाई, म्हशी, शेळयाना झाला . यावर्षी बंधारा उंची व खोली , रूंदी श्रमदानातून वाढवली असून त्याची क्षमता तीस लाख लिटर क्षमता केली आहे . या जलकुंभास जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव 

श्री . दत्ताप्पा ईटके गुरूजी, प्राचार्य डॉ . रमेश राठोड  यांनी भेट देऊन  उपक्रमचे कौतुक केले . हि संकल्पना रा . से . यो. संयोजक  प्रा . डॉ . माधव रोडे, व सखाराम नाईक ज्युनिअर कॉलज प्राचार्य अरूण पवार ,  

सरपंच विजय राठोड यांच्या राबविली . यात विशेष सहभाग याकार्यक्रमधिकारी प्रा . डॉ . भीमानंद गजभारे, प्रा . दिलीप गायकवाड, प्रा .डॉ . श्रीहरी गुट्टे, विश्वजीत हके, सौरभ सातपुते, राम फड, दिव्या भोयटे, अर्पणा ओपळे, अभिषेक रोडे, आरती शिंदे, नेहा आदोडे, किर्तीश्र्वर गीत्ते, कृष्णा रोडे, ज्ञानेश्र्वर मुंडे, योगेश ढाकणे, होंळबे, आदि घेतला . 

श्रमदानतून जो जलकुंभ उभा करण्यात आला आहे तो ज्या दोन वनविभाग डोंगराच्या कुशीत आहे त्या डोंगरा अंकुर बीज बॅंकेतील बीज रोपणाचा कार्यक्रम येणाऱ्या जुनच्या पावसाळ्यात राबविण्यात येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या