Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील अस्तव्यस्त वाहतुक पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज...

 



आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फळ विक्रेत्यांकडून मारहाण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात - फळ विक्रेत्यांनी टोळक्याने  एकाचे -डोकेचे फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाजार समिती परिसरात - हात गाडीवाले, फुटपाथवर बसणारे - व्यावसायिक व फळ विक्रेते हे कुठल्याच नियमाचे पालन न करता रस्त्यावर बसतात. 


तसेच इथे जागा मिळविण्यासाठी एकमेकांत सतत वाद घालतात. दि.१०रोजी बुधवारी झालेल्या वादाचे - रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि सात ते आठ जणांनी मिळून एका जणास - धरून भाजीपाला मोजण्याच्या मापाने डोक्यात मारत जखमी केल्याची घटना नुकतीच 

घडली आहे. या मारहाणीत एका युवकाचे मोठे प्रमाणावर डोके फुटले असून, अशा प्रकारच्या रोजच्या भांडणांनी मोंढ्यातील वातावरण नेहमीच त्रासदायक दहशत निर्माण करणारे होते. 

मुख्य बाजारपेठेतच असे प्रकार सर्रास वाढलेनेअशांतता निर्माण होत आहे. दरम्यान, मोंढ्यात रस्त्यावर उभे राहणाऱ्या हातगाडेवाले, फळ विक्रेते गाडीवाले यांच्या मुजोरीचा सामना नेहमीच सर्वसामान्य नागरिकांनाही करावा लागतो. वाहनधारकांनाही ये-जा करताना अडचण सहन करावी लागते. यावर ठोस असा काहीतरी तोडगा काढावा अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. 

 यावर कोणीच लक्ष देत नाही. याचा त्रास मात्र बाजारपेठेतील अन्य व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच होत आहे. यावर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या