Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत घर नसणारांना मिळणार अगदी माफक दरात स्वतःचं हक्काचं सुसज्ज घर

 


ना.धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी 'आनंदी घरकुल' प्रकल्प: ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते माहितीपत्रकाचे झाले विमोचन

आपला ई पेपर परळी वैजनाथ, प्रतिनिधी

            आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. मात्र जागेच्या वाढत्या किंमती, आर्थिक अडचण व घर बांधकामासाठी लागणारी तजवीज या सर्व अडचणी असतात. आता ही चिंता दूर होणार असुन ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात एक महत्त्वकांक्षी गृहप्रकल्प राबवला जात आहे.'आनंदी घरकुल' प्रकल्पांतर्गत परळीत घर नसणाऱ्या, गरजू व सर्वांनाच परवडेल अशी सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी व अतिशय माफक दरात नागरिकांनी स्वतःच्या हक्काचे घर मिळणार आहे.या प्रकल्पाच्या माहितीपत्रकाचे नुकतेच ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

           राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुनएक महत्त्वाकांक्षी प्रकल्प  प्रस्तावित आहे.गरजूंना हक्काचं छप्पर, कमीतकमी परवडणाऱ्या किंमतीत सुसज्ज १५०० घरांचा गृहप्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे.ऐतिहासिक परंपरा लाभलेले परळी वैजनाथ शहर वेगाने विकासाकडे झेपावत आहे. शहराच्या अंतर्गत भागात जुन्या वास्तू व बाहेरच्या भागात शेती असे साधारण १५-२० वर्षांपूर्वीचे चित्र आता बदलले आहे. शहरातही मोठ्या वास्तू उभ्या राहात आहेत व शहराच्या बाहेरच्या बाजूसही नवनव्या वसाहती-गृह प्रकल्प आकाराला येत आहेत.परळी शहरांमध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाही ,जे भाड्याच्या घरात राहतात, नवीन घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, कामगार, श्रमिक, शेतमजूर, विविध उद्योगांमधील मजूर ,असंघटित क्षेत्रातील कामगार, रोजंदारीवर काम करणारे अशा अत्यंत गरजू व घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माफक दरात 'आनंदी घरकुल' हा घरकुल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी परवडणाऱ्या किंमतीत आता परळीत नागरिकांचं घराचं स्वप्न  साकार होणार आहे.

         ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 'आनंदी घरकुल' या प्रकल्पाच्या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा प्रकल्प संयोजक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार, नगरसेवक शरद मुंडे, अन्वर मिस्कीन, रवी मुळे,शंकर कापसे, सुरेश नानावटे, पवन फुटके,डी.जी.मस्के आदी उपस्थित होते. या प्रकल्पात नोंदणी करून आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक व सर्वोपयोगी हा प्रकल्प आहे. ज्यांचे स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना याचा निश्चितच लाभ होईल असे यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 ● 5 ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी अभियान

        आनंदी घरकुल या प्रकल्पातून घर घेऊ इच्छिणारांसाठी नोंदणी आवश्यक आहे.यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर प्रांगणात 5 ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी अभियान  राबविण्यात येणार आहे.आवश्यक कागदपत्रासह नागरीकांनी नोंदणी करावी. आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयुक्त या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा 'आनंदी घरकुल' चे प्रकल्प संयोजक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या