Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले असे मानणारे समाजसेवक राजकारणी डॉ.संतोष मुंडे



वाढदिवस म्हणजे आयुष्यातलं एक वर्ष कमी होण असं आहे.पण काही जणांच्या बाबतीत आयुष्यातून गेलेलं वर्ष जर  समाधान देत असेल तर  अशा व्यक्तींचा वाढदिवस होणं क्रम प्राप्त असत एरवी इतरांनी एक वर्ष कमी झाले आहे असं मानायला हरकत नाही.तरी सुद्धा 'वाढदिवस'प्रत्येकासाठी भावनिक आधार देणारा आणि संवेदनाचा तपास घेणारा निश्चित असतो. त्यामुळं आपण एक वर्ष जगलात तर समाजातील गरजूंना आपल्या (जिवंतपणाची)मदत व्हावी आपलं पृथ्वीवरील अस्तित्व  काहीतरी समाजोपोगी उपक्रम राबवून समाजाच्या कामी यावं या पवित्र हेतूने जे कोणी कार्य करीत आहेत त्यांचा नक्कीच वाढदिवस साजरा व्हायला हवाच! आज अशाच एका व्यक्ती विशेषाचा वाढदिवस आहे ते व्यक्तिमत्त्व डॉ. संतोषजी मुंडे.त्यांची व्यक्तिरेखा माझ्या शब्दांच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.मी कुणावरही विनाकारण स्तुतिसुमनं उधळत नाही.कारण तो माझा स्वभावच नाही.यापूर्वी एक - दोन व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत.योग्यतेचे कौतुक झालं पाहिजे पण त्या त्याचबरोबर अयोग्यतेवर प्रहार झाला पाहिजे ही माझी समीक्षण भूमिका आहे. अशात मी कुणासाठी माझी शब्द संपदा खर्च केली नाही किंवा करावीशी वाटली नाही,पण या अजातशत्रू व्यक्तिमत्वासाठी लेखणी प्रेरित झाली.त्याला कारणही तस  आहे..


सद्यस्थितीत सगळीकडेच आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाने दुःखी होणारी माणसं जास्त आहेत किंबहुना इतरांना अडचणीत आणून आपलं वर्चस्व कसं सिद्ध करता येईल यासाठीच बऱ्याच महाभागांची धडपड चालू असते.पण अशा काळात सुद्धा डॉ. संतोष मुंडे हे अडचणीत असलेल्याना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतात.जरी एखाद्याची अडचण सोडवता आली नाही तरी आणखी अडचणी वाढवाव्यात अशी भूमिका डॉक्टरांची कधीच नसते. झाली तर मदतच नाही तर त्रास कुणाला दिला अस माझ्या पाहन्यात नाही.




"भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना,पुष्प नही बन सकते तो फिर कांटे बनकर मत रहना"

 या नीतीने वागणारा हा माणूस, 

दिव्यांग आणि वंचिताचा हक्काचं व्यासपीठ डॉक्टर संतोष मुंडे

एखाद्या गावच्या मातीमध्येच नेतृत्व करण्याचा गुण दडलेला असतो. नाथऱ्याच्या मातीत हा गुण आहे,या मातीतल्या माणसाने देशाचं नेतृत्व केलं राज्य पातळीवर नेतृत्व करत आहेत. साहेबांच्या कुटुंबा व्यतिरिक्त एक नाव जे राज्यपातळीवर सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून काम करतय ते म्हणजे डॉ.संतोष मुंडे. समजाने आणि वेळप्रसंगी कुटुंबाने नाकारलेल्या दिव्यांग,अनाथ आणि वंचितांना जवळ घेऊन त्यांना आत्मसन्मान देउन त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याच आणि त्यांचा आवाज बनण्याचं काम डॉ. संतोष मुंडे यांनी केलेल आहे.

   डॉ. संतोष मुंडे आज महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग अभियान आपल्या दारी च्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत या अभियानाच्या अध्यक्षपदी आ.बच्चू कडू हे आहेत. डॉक्टरना या पदावर येण्यासाठी प्रत्येक कसोटीवर उत्तीर्ण व्हावं लागला आहे. कुठलाही राजकीय, सामाजिक वारसा नसताना अशा शासकीय  पदापर्यंत पोहचणं सोपं नाही. 2008 मध्ये डॉक्टरानी परळी वैजनाथ येथे वैद्यकीय व्यवसाय सुरुवात केली. या सेवेतून समाजाशी आलेला संपर्क व त्यांची संवेदनशीलता आणि ना. बच्चुभाऊ कडू यांचा सहवास त्यातून वंचित आणि अपंगांचे प्रश्न याकडे त्यांचं लक्ष वेधल गेले.आणि सुरू झाला समाज सेवेचा प्रवास... मेडिकल असोसिएशन अध्यक्ष, राज्य समन्वयक प्रहार संघटना,राज्य उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र कॉमर्स &चेंबर्स असोसिशन चे सदस्य ते आत्ता महाराष्ट्र शासनाच्या " शासन दिव्यांगाच्या दारी अभियान"उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी समाजसेवेचा रथ  इथपर्यंत आणला आहे.

माणुसकीचा झरा... सेवा हीच पूजा

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण सेवा करत आहोत असंच प्रत्येक जण म्हणतो. मग ते राजकारण असो की समाजकारण, वैद्यकीय असो की शिक्षण. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी असते तर ती सेवा नसते तर सेवेच्या नावाखाली ही मंडळी मेवा खाताना दिसतात पण या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडे मात्र अपवाद ठरतात वैद्यकीय सेवा करत असताना सर्वांपेक्षा कमी फीस घेऊन त्यातही दिवसाकाठी अर्धे पेशंट अर्धी फी /मोफत तपासतात.त्यात अपंग,अनाथ,माजी सैनिक,मोफत तर गरीब कुटुंबातील,ज्येष्ठ नागरिक,विधवा, परित्यक्ता इत्यादीना अर्धी फी घेऊन आजही कुठेतरी माणुसकीचा झरा परळीच्या वैद्यकीय क्षेत्रात जिवंत असल्याचं पाहायला मिळत. दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी आपल्या परळी व परिसरात सुविधा उपलब्ध नाहीत त्या गरजू रूग्णांना मुंबई,पुणे इथल्या दवाखान्यात उपचारासाठी मार्गदर्शनापासून ते वेगवेगळ्या शासकीय योजनेतून रूग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतात. कित्येक रुणांना उपचार करून त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ मिळवून दिला आहे. प्रत्येक गावात रुग्णांच्या सेवेसाठी ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्रांची आरोग्य संघटना डॉक्टरांच्या माध्यमातून उभी राहिली आहे.

   तसेच डॉक्टर सचिव असलेल्या पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथरा येथे आजही निवासी बालक आश्रम आहे.या बालक आश्रम मध्ये जवळपास 200 विद्यार्थी आहेत. शासनाने बालक आश्रम यापूर्वीच 2019 मध्ये बंद केले आहेत.पण कोणताही शासकीय अनुदान नसताना 200 विद्यार्थ्यांचं संगोपन गेली 5-6 वर्ष डॉक्टर स्वखर्चाने करत आहेत.

राजकारणातून समाजकारण करत असताना समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच आंदोलन केली आहेत.ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.मुंबई, दिल्ली याठिकाणी अपंगाच्या मागण्यासाठी केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर केसेस ही झाल्या. त्यांच्या संघर्षामुळे कुठेतरी या अपंगाना "दीव्यांग"म्हणून संबोधले गेले.3%निधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगासाठी देण्याचा शासन निर्णय झाला, दिव्यांगाना घरकुल,तसेच त्यांना शासकीय मानधन व त्यात वाढ हे सुद्धा निर्णय त्यांच्या पदरात पाडून देण्यासाठी डॉक्टरांनी बच्चू भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. कर्णबधीर,अस्थिव्यंग, मूकबधिर यांच्यासाठी राज्यस्तरीय श्रवणयंत्र,कुबड्या, गाडे वितरण शिबिर आयोजित करून दिव्यांगाना लाभ मिळवून दिला. 

क्षेत्र कोणतंही असो या व्यक्तिवाने सेवा हीच पूजा मानून प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे तेही निरपेक्ष भावनेन..

जरी फळाची अपेक्षा ठेवली नसली तरी कुठेतरी या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला ना.धनंजय मुंडे व ना.बच्चु कडू यांनी न्याय देऊन शासन दिव्यंगाचे दारी अभियानाचे उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या प्रतिभेला साजेशीच आहे कारण या माध्यमातूनच त्यांना वंचित, दीव्यांग,अनाथ यांचे अश्रू पुसण्यासाठी अधिकार आणि उत्साह मिळणार आहे. 

कर्मण्यवधिका रास्ते मां फलेषु कदाचन'..  फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने काम करणारा हा माणूस अनाथ,गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाची योजना बंद पडून सुद्धा बालक आश्रमात गेल्या 5-6 वर्षापासून स्वखर्चाने 200 विद्यार्थ्यांचे संगोपन करतोय. रोज दिव्यांग,अनाथ,माजीसैनिक,रुग्ण एक रूपया न घेता मोफत तपासतो. दिव्यांग व वंचितासाठी आंदोलन करतो,केसेस अंगावर घेतो.काय स्वार्थ?काय अपेक्षा?उत्तर फक्त अंतःकरणातली सात्विक संवेदना आणि सामाजिक बांधिलकी.त्यामुळं हे शब्दपुष्प.

             *ॲड.श्रीनिवास मुंडे

       (माजी सरपंच गोपीनाथ गड,पांगरी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या