Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

आपला ई पेपर/ परळी/ प्रतिनिधी


राजस्थानीज पोदार स्कूल येथे आज (दि 3 )जानेवारी बुधवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.



यावेळी शाळेतील मुलींच्या हस्ते या प्रतिमांचे पूजन करण्यात आले  विशेष अतिथी म्हणून शाळेतील विद्यार्थिनींना निमंत्रित करण्यात आले.

या वेळी सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद उपप्राचार्य लक्ष्मण पाटील शाळेतील शिक्षिका व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. क्रांतीज्योतीच्या जयंतीनिमित्त राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थिनींनी यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आपली मत व्यक्त करताना कु. आरोही बिडगर (इयत्ता पहिली) वैष्णवी जाधव (इयत्ता आठवी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या