Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

13 जानेवारी ला होणारी बीडची ओबीसी महाएल्गार सभा ऐतिहासिक ठरणार :अक्षय बांगर

 

आपला ई पेपर पाटोदा 


पाटोदा येत्या 13 जानेवारी रोजी बीड येथे ओबीसी चे राष्ट्रीय नेते ना.छगनराव भुजबळ यांची महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे 13 जानेवारीची महालगार सभा न भूतो न भविष्यती अशी होणार असून लाखोच्या संख्येने ओबीसी समाजबांधव या ऐतिहासिक महाएल्गार.  सभेचे साक्षीदार होणार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन युवक जिल्हाध्यक्ष अक्षय बाळासाहेब बांगर यांनी व्यक्त केला 

ओबीसी समाजाच्या आरक्षणा कसलाही प्रकारे धक्का लागू नये ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करावी यादी मागण्यासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन राव भुजबळ सपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओबीसी समाजाची जनजागृती करण्यासाठी सभा मेळावे घेत आहेत बीड जिल्हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नामदार छगनराव भुजबळ यांची सभा व्हावी अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.सर्व महासभांना ओबीसी समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित दर्शविली आहे. ओबीसी समाजाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी लाखोंचा ओबीसी जनसमुदाय रस्त्यावर उतरत असून ना. छगनराव भुजबळ यांना समर्थन देत आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे. या मागणीसाठी येत्या १३ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक महाएल्गार सभेला उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन बीड जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय बाळासाहेब बांगर यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या