Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल संतोष बारटक्के व आबासाहेब नानवटे हे पोदार स्कूलच्या वतीने सन्मानित

आपला ई पेपर / परळी / प्रतिनिधी 



प्रिंट, डिजिटल मिडिया व समाज माध्यमातील उत्कृष्ट कार्याबद्दल आज (दि.६) जानेवारी शनिवार रोजी दर्पण दिनाच्या निमित्ताने राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे दर्पण दिनाच्या आयोजित कार्यक्रमात शाळेच्या वतीने पत्रकार संतोष बारटक्के व सोशल मीडिया प्रमुख आबासाहेब नानवटे यांना सन्मानित करण्यात आले.

ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवीत असतात; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचा गुणगौरव करणारे पत्रकार परंतु समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे.

शालेय समितीच्या वतीने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार व सोशल मीडिया तील उत्कृष्ट वार्तांकनामुळे पत्रकार संतोष बारटक्के व आबासाहेब नानवटे यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या