Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलचे 11 विद्यार्थी अखिल भारतीय हिंदी परीक्षेत हिंदी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

 आपला ई पेपर | परळी | प्रतिनिधी


राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या 11 विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय हिंदी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून पोदार लर्न स्कूल येथील 11 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषा हिंदी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे-30 तर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेच्या घोषित निकालात 11 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आणि राष्ट्रीय राजभाषा हिंदी गौरव रत्न पुरस्कार अंतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त अखिल भारतीय राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने 2024 आदर्श विद्यालय पुरस्कार व आदर्श प्राचार्य पुरस्कार राजस्थानीज पोदार लर्न स्कूल ला मिळाला आहे.

ज्यामध्ये हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्यातर्फे मानांकित विद्यार्थ्यांना पदक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.सावी आशिष पर्वत इयत्ता पहिली ,अमर नासिर सय्यद इयत्ता दुसरी ,श्रावणी सतीश जिभकाटे इयत्ता तिसरी, यशश्री बळीराम चौरे इयत्ता चौथी, श्रेयस सूर्यवंशी इयत्ता पाचवी ,कैफिया शेख इयत्ता सहावी, राम लटपटे इयत्ता सातवी, वैष्णवी मुंडे इयत्ता आठवी ,प्रद्दीम्न बदने इयत्ता नववी ,श्रुती शिंदे इयत्ता दहावी, शिवराज गायकवाड इयत्ता दहावी राष्ट्रीय राजभाषा हिंदी गौरव रत्न पुरस्कार अंतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त केला.ज्यामध्ये हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्यातर्फे मानांकित विद्यार्थ्यांना पदक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग म्हणाले की, हिंदी भाषा ही राष्ट्राची शान आणि अभिमान आहे. हिंदी ही भारताला एकत्र बांधते. आपल्या अनेक पिढ्यांनी त्याच्या संवर्धनासाठी काम केले आहे. 

शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. 

तसेच मार्गदर्शक शिक्षक हिंदी भाषा प्रमुख अंकुश पवार, पुनम मुंडे, मनीषा वाघ, अंजली नानवटे, रुपेश व्हावळे, शाईन पठाण यांचे ही राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या