Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात | डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


परळी जिरेवाडी बायपास रस्त्यावर नुकताच दुचाकीचा अपघात झाला असून दुचाकीवर असलेल्या बावीस  वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मुकींद मुंडे राहणार डाबी वय 22वर्ष असे त्यांचे नाव आहे. सोमवार दि.1 जानेवारी सायंकाळी आठच्या सुमारास जिरेवाडी बायपास वरून गावाकडे जात असताना ही घटना घडली आहे.

मृतदेह परळी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहचले असून पुढील अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या