आपला ई पेपर परळी वार्ताहर
दि.14 जानेवारी 2024
येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तारदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
या अभिवादनानंतर इतिहास विभाग प्रमुख डॉ.विनोद जगतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा इतिहास विशद केला. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ. विलास देशपांडे , कार्यालयीन अधीक्षक श्री सुहास कण्व ,श्री अनिल पत्की , श्री विकास देशपांडे श्री प्रमोद पत्की आणि इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin