Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

IACD | भ्रष्टाचार विरोधी दिन स्पेशल | International Anti Corruption Day

 जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन

IACD

आपला ई पेपर भ्रष्टाचार विरोधी दिन स्पेशलInternational Anti Corruption Dayभ्रष्टाचार ही फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला लागलेली कीड आहे. कमी जास्त प्रमाणात सर्वच देशात भ्रष्टाचार पसरलेला आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकशाहीच्या विकासातील भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. हे ओळखून संयुक्त राष्ट्र संघनटेने २००५ सालापासून जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिनInternational Anti Corruption Day) पाळण्यास सुरुवात केली. 

संयुक्त राष्ट्राने ३१ ऑक्टोबर २००३ साली पहिल्यांदा भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेतली. त्याचवेळी ९ डिसेंबर हा भ्रष्टाचार विरोधी दिवस ठरविण्यात आला. मात्र, २००५ सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. भ्रष्टाचार विरोधी जगजागृती करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. भ्रष्टाचारातून व्यक्तीची प्रमाणिकता, नितीमत्ता, सचोटी, निष्ठा संपल्याचे दिसून येते. 

स्वार्थासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी अनेक जण पदाचा, खुर्चीचा गैरवापर करतात. त्यामुळे लोकशाही मुल्यांची किंमतही कमी होते. अस्थिर सरकारे, आर्थिकदृष्या मागासपणा, विकासाची संथ गती, गरीबी, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकल्याणकारी योजनांचा खेळखंडोबा होण्यास भ्रष्टाचार कारणीभूत आहे. प्रत्येक वर्षी जगभरात सुमारे १ ट्रिलियन डॉलर लाच म्हणून दिली जाते. 

तर सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर भ्रष्टाचारी हडप करतात. ही रक्कम जागतिक जीडीपीच्या ५ टक्के आहे. विकसनशील देशांत विकासासाठी देण्यात येणारा निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो.

अर्थव्यवस्थेला कमकुवत करणाऱ्या आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या या राक्षसाला संपविण्याचा सारे मिळून निर्धार करू या.

*संजीव वेलणकर, पुणे
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या