Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR-RPLS I पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी I पंकज मुंडेचे I स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश I

 आपला ई पेपर | परळी | प्रतिनिधी PODAR-RPLS

PODAR

PODAR परळी येथील राजस्थानी पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी पंकज मुंडे याने  बीड येथे आयोजित स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राज्य पातळीवरील खेळासाठी त्याची निवड झाली आहे.मंगळवार (दि 5) डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्केटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आले आहे.

 नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत PODAR-RPLS राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी चि.पंकज मुंडेची विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याची निवड झाल्यामुळे या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे. 

पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी चि. पंकज मुंडेची राज्य पातळीवरील स्केटिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शालेय समितीच्या वतीने  अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी PODAR-RPLS पोदार लर्न स्कूलचे क्रीडा शिक्षक सूर्यकांत घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी यश मिळवले आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या