Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्वातंत्र्याचे ७५ वर्ष होऊनही शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहचलो नाहीत याची खंत डॉ संतोष मुंडे


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित भव्य मोफत कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या मोजमाप शिबिराचा घेतला १८२ दिव्यांगांनी लाभ


आपला ई पेपर परळी वैजनाथ: दि ८ डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे संपन्न झालेल्या भव्य मोफत कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या मोजमाप शिबिराचा १८२ दिव्यांगांनी लाभ घेतला अशी माहिती या शिबिराचे संपर्क प्रमुख ,दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली.


रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य मोफत मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशीही माहिती डॉ संतोष मुंडे यांनी दिली

दिव्यांगाच्या प्रत्येक प्रश्नासाठी शासन दरबारी सतत विविध आंदोलने करणारे आणि दिव्यांगंच्या प्रयेक अडचणींवर मात करणारे डॉ संतोष मुंडे हे दिव्यांगाचे कैवारी म्हणून सर्वदूर ओळखले जातात

या शिबिराचे प्रास्ताविक करतानाही डॉ.संतोष मुंडे यांचे दिव्यांग बांधवाप्रति असणारी असाधारण तळमळ अतिशय उत्स्फूर्त दिसून आली भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष होऊनही शेवटच्या दिव्यांगापर्यंत आपण पोहचलो नाहीत याची खंत अशा अतिशय मार्मिक भावना त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी व्यक्त केल्या

या प्रसंगी रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीमती नंदिनी ठक्कर मॅडम राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर प्रमुख बाजीराव भैया धर्माधिकारी ,प्रा.मधुकर आघाव सर ,शहराध्यक्ष वैजनाथराव सोळंके ,राजस्थावरून आलेले स्वामी पुरुषोत्तमानंद महाराज, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ शालिनीताई कराड ,सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजाराम मुंडे,  बालरोगतज्ज्ञ डॉ राजेश जाजू दंतरोग तज्ज्ञ डॉ दिनेश लोढा,डॉ.अमोल चाटे, अड .मंजित सुगरे ,ह भ प कोकाटे महाराज, श्रीनाथ मानव सेवा मंडळचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे ,डॉ देविदास मुंडे, अंबाजोगाई  रोटरी अध्यक्ष स्वप्नील परदेशी,रोटरी सचिव गणेश राऊत,रोटरी सहसचिव हर्षवर्धन वडमारे आदी मान्यवर उपस्थित होते,       

अशा भव्य मोफत मोजमाप शिबिरास यशस्वी पारपाडण्यासाठी रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टची पूर्ण टीम ज्यामध्ये श्रीमती नंदिनी ठक्कर मॅडम, मनोज चव्हाण सर  ,रामसुजाण साकेत सर,  राजेश माने सर , रवींद्र शिंदे सर  या सर्वांनी शिबिरास उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या व कॅलिपर्स यांचे सकाळी १० पासून सायंकाळी ५ पर्यंत मोजमाप केले. शिबिर समारोप प्रसंगी बोलताना ज्या दिव्यंगांच्या कृत्रिम हात व मॉड्युलर पायांचे मोजमाप झाले आहे त्यांनाच पुढील शिबिरामध्ये हे कृत्रिम हात व पाय मिळणार आहेत अशी सूचना या शिबिराचे संपर्कप्रमुख डॉक्टर संतोष मुंडे यांनी दिली त्यानंतर मंजीत सुगरे यांनी शिबिरास उपस्थित सर्व मान्यवरांचे व दिव्यांग बांधवांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या