Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत कृत्रिम हात ,मॉड्युलर पाय व कुबड्या डॉ. संतोष मुंडे

आपला ई पेपर /परळी:दि 7 डिसेंबर


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे भव्य मोफत कृत्रिम हात,  मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व धनंजयजी मुंडे आरोग्य मित्र योजना तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती या शिबिराचे  संपर्कप्रमुख  दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष मा. डॉ संतोषजी मुंडे यांनी दिली.

दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्याचबरोबर प्रसंगी दिव्यांगाच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या अथक प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या शिबिरांतर्गत ज्या दिव्यांगांना हात किंवा पाय नाही त्याचबरोबर जो दिव्यांग अपघातामध्ये आपला हात किंवा पाय हरवून बसला आहे अशा सर्व दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या ,कॅलिपर्स मोफत देण्यासाठी या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान ज्या दिव्यांग नागरिकांचे या शिबिरात मोजमाप होईल त्यांनाच या मोफत हात, मॉड्युलर पाय कुबड्या कॅलिपर्स यांचा लाभ होईल अशीही माहिती देण्यात आलेली आहे.

तरी परिसरातील गरजू दिव्यांगांनी या भव्य मोफत मोजमाप शिबिरासाठी श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान या शिबिराचे संपर्कप्रमुख डॉक्टर संतोष मुंडे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या