Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हीच ती वेळ एकमेकांना जपण्याची अफवेवर विश्वास ठेवाल तर तुम्हीही अडचणीत याल...

 


आपला ई पेपर ₹ जोशींचीतासिका


आता थोड्याश्या तांत्रिक बाबी समजून घेवू; कोणतीही बँक ही तिच्या ठेवींच्या सत्तर टक्के रक्कम कर्ज देऊ शकते. काही रक्कम बँक स्थावर मालमत्ता किंवा इतर आर्थिक संस्थांत गुंतवणूक केली जाते. राजस्थानी मल्टिस्टेटने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ठेवी जवळपास २८३ कोटींच्या आहेत तर सुमारे २२९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. गुंतवणूक आहे २८.३० कोटींची तर तर संस्थेच्या स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य अंदाजे १५१ कोटी आहे.

आता कल्पना करा की अफवा पसरल्यावर जर अचानकपणे ठेवीदारांची झुंबड उडाली तर काय होईल? कोणतीतरी आर्थिक संस्था सर्वांना एकरकमी रक्कम एकाच दिवसांत कशी देऊ शकेल? इथे राष्ट्रीयकृत बँका असो किंवा दस्तुरखुद्द आर.बी.आय. त्यांना हे शक्य नाही. जसे काही ठेवीदार मुदतपूर्व ठेवींच्या संपूर्ण रक्कम मागत आहेत तसे कर्जदार बँकेला एकाचवेळी मुदतपूर्व कर्ज परत करू शकतील का? तसेच बँकही त्यांच्या कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज कसे वसूल करू शकेल? याचाही विचार व्हायला हवा. बँकिंग व्यवस्थेत विश्वास महत्त्वाचा आहे तो संस्था आणि ग्राहक दोघांनी जपला तरच गणित चपखल बसते अन्यथा विघ्नसंतोषी लोकांचे फावते.

संस्थाचालक चंदूलाल बियाणी यांचे वकीलपत्र घेऊन मी आज लिहीत नाहीये. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शहराच्या विकासातील निर्विवाद योगदान सर्वश्रुत आहे. मुळात ज्याचा पैसा आहे त्याची भीती रास्त आहे पण एका फुटकळ अफवेवर विश्वास ठेवाल संस्था आणि तुम्हीही अडचणीत याल. आज राजस्थानी मल्टिस्टेटच्या अफवेनंतर शहरातील काही लहान मोठ्या पतसंस्थांना त्याचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. यामुळे परळी वैजनाथ शहराचे अर्थचक्र अडचणीत येण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. आगामी काळात खाजगी सावकारी बोकाळली तर लोकं देशोधडीला लागतील. आपण नेहमीप्रमाणे एकमेकांना साथ देणे अत्यावश्यक आहे. जर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील आर्थिक संस्था टिकल्या तर सामान्य वर्ग जगेल.

याआधीही परळीकरांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत त्यात कोणीही राजकीय हेतूने सामील झाले नाही. उदाहरणार्थ शहरात राबविलेली वृक्षसंवर्धन चळवळ, भारनियमन मुक्ती, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, केरळला नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत फेरी, परळी अंबाजोगाई रस्त्यासाठी घेतलेली सामूहिक भूमिका, कु. सानवी चौंडेला दुर्धर आजारात मदत करण्यासाठी केलेली मदत फेरी (यातून तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू झाले आहेत) असे अनेक उपक्रम सांगता येतील ज्यात परळीकर जात, धर्म, पंथ न पाहता एकमेकांच्या मदतीसाठी हिरीरीने पुढे सरसावतो.

आता पुन्हा एकदा वेळ आली आहे आपण सर्वांनी Collective Efforts घेऊन राजस्थानी मल्टिस्टेटसह शहरातील इतर आर्थिक संस्थांना आधार द्यायची. मला खात्री आहे प्रभू वैद्यनाथाच्या आशिर्वादाने सर्व काही लवकर सुरळीत होईल.

*राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*

१. तुमच्या प्रत्येक शाखेबाहेर तुमच्या संस्थेचा आर्थिक ताळेबंदाचे होर्डिंग्ज लावणे.

२. होर्डिंग्जवर सर्व संचालकांचे नावं, चालू मोबाईल नंबर देणे जेणेकरून ग्राहकांना वेळीच शंकानिरसन करून घेता येईल.

३. तज्ज्ञ लीगल एडव्हायझर बोर्ड नेमून त्यांचीही नावं, मोबाईल नंबरसह माहिती देणे

४. अफवा पसरवणाऱ्या ज्ञात / अज्ञात लोकांविरुद्ध रीतसर पोलीस तक्रार करणे.

*परळीकरांना तत्काळ नम्र विनंती*

सोमवार ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता राजस्थानी मल्टिस्टेट व इतर आर्थिक पतसंस्थांसाठी व त्यांच्या ग्राहकांसाठी राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ एकत्र येऊया. त्यानंतर इच्छुकांनी आपल्या इच्छेनुसार सामूहिक एफ. डी. करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करूयात.

शेवटी इतकचं म्हणेन सहकाराची मूळ व्याख्या आणि संकल्पना 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीत सामावलेली आहे. हीच ती वेळ आहे ही उक्ती सार्थ करून स्वतःची व शहराची प्रगती साधण्याची.

सध्या सर्वत्र अफवांचा बाजार पिकलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले आहे. याचे फटके संबंधित मल्टिस्टेट किंवा पतसंस्थाना बसत आहेतच पण सोबतच ठेवीदार अस्वस्थ झालेत हे सारे झाले आहे फक्त अफवांमुळे.

अफवा किंवा कम्युनिकेशन गॅप काय अनर्थ घडवू शकतो याचे प्रात्यक्षिक 

इथे तर कोणतीही आर्थिक संस्था, तिचे संचालक, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक आणि ज्यांचा संस्थेशी दुरान्वये संबंध नाही अशा लाखो करोडो लोकांमध्ये अर्थाचा काय अनर्थ काढला जात असावा.

बीडच्या ज्ञानराधाच्या अफवे नंतर परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ही क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाबत अशीच अफवा शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी पसरवली गेली. आता हे लक्षात घ्या हुशारीने शुक्रवार निवडला गेला असणार जेणेकरून शनिवार, रविवारी बँकेला सुट्टी त्यांनंतर सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक जयंती असल्याने बँकांना सुट्टी होती. या तीन दिवसांत अफवा वाऱ्यासारखी पसरली. नको त्या चर्चांना उधाण आल्याने सामान्य ग्राहक वर्ग अस्वस्थ होणे स्वाभाविक होते.

त्यानंतर बोटावर मोजता येईल इतक्या अतिउत्साही लोकांनी मल्टिस्टेटच्या काही शाखांत जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो इतर सुजाण ग्राहकांनीच उधळून लावला. यासाठी परळीकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

जय हिंद,

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ दि. ३ डिसेंबर २०२३

*माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी  बोलतो...*
*मोठा तर तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजावून घेतो...*

     💐 🙏*शुभ सकाळ* 🙏💐*

👇🔴👇👇👇
*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या