Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ऑपरेशन लोटस विजयी |आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अलर्ट मोडवर...

 


सर्व एक्झिट पोल खोटे ठरवत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ वर चर्चा सुरू...

आपला ई पेपर ∆ प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपची बाजी...

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब लोकसभेत उमटणार असल्याने काँग्रेस व भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनली होती. या लढाईमध्ये अखेर भाजपने बाजी मारली आहे. ऑपरेशन लोटस विजयी झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अलर्ट मोडवर आला आहे.

भाजपने मध्य प्रदेशात सत्ता टिकवली आणि जागाही वाढवल्या. यामुळे पुन्हा एकदा ब्रँड मोदीचं यश अधोरेखित झालं. सर्व एक्झिट पोल खोटे ठरवत भाजपने मध्यप्रदेशात मोठी मुसंडी मारली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून...

 बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्या मानाने मध्यप्रदेशातील काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली आहे. असे असले तरी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा रंगली आहे. 

भाजप पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्या हातीच राज्याची सत्ता देणार की अन्य कुणाला मुख्यमंत्री करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाराज सिंह मुख्यमंत्री झाल्यास राज्यात ते पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित भाजप मध्यप्रदेशसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याने सर्वांच्या नजरा मध्यप्रदेशवर खिळल्या आहेत.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

छत्तीसगडमध्ये सर्वच एक्झिट पोल्सनी छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला होता. निवडणूक निकालांच्या कलानुसार छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या