Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

🎭 "नाटय कलेचा जागर" शंभरावे अ.भा. नाट्यसंमेलनातील अनोखी संकल्पना

 आपला ई पेपर मुंबई 

🎭 "नाटय कलेचा जागर" शंभरावे अ.भा. नाट्यसंमेलनातील अनोखी संकल्पना
-----------------------------------
मराठी माणूस आणि नाटक हे समीकरण सर्वश्रुत आहे.
नाटय संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे १०० वे नाट्य संमेलन धूमधडाक्यात साजरे होणार आहे.
राज्यात अनेक नाटय संस्था,बालनाट्य संस्था आहेत.या संस्था धडपड करून आपले नाटय प्रेम सिद्ध करत असतात.

अशा सर्व धडपड्या संस्थांना त्यांचे नाटय प्रयोग सादर करण्याची संधी मिळावी म्हणून "नाटय कलेचा जागर" ही संकल्पना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आखली असून या संकल्पने अंतर्गत राज्यात 22 ठिकाणी मोठ्यांच्या व छोट्यांच्या नाट्य स्पर्धा ,एकपात्री अभिनय स्पर्धा ,नाट्यछटा स्पर्धा, नाट्य संगीत स्पर्धा आणि नाट्य वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांद्वारे महाराष्ट्र राज्यातील हजारो कलाकार, बालकलाकार यांना संमेलनाचा भाग बनविण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
आज पर्यंत मोठ्या कलाकारांची बडी व्यवसायिक नाटके संमेलनात व्हायची. 

यंदा प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकार आणि रंगकर्मी यांना संमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या विविध स्पर्धां द्वारे मिळणार आहे.
स्पर्धेचा कार्यक्रम भरगच्च आहे आणि इनाम देखील भरघोस ठेवलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व नाट्यप्रेमींना विनंती आहे की त्यांनी या शंभराव्या ऐतिहासिक नाट्य संमेलनात सहभागी होऊन हे नाट्य संमेलन संस्मरणीय करण्यास मदत करावी.


खाली 👇👇👇दिलेल्या लिंक वर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती आपण 
https://www.natyaparishad.org
या लिंकवरून घ्यावी.असे आवाहन नाट्यपरिषदेच्या वतीने  करण्यात आल्याची माहिती रंगकर्मी
प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या