Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे रविवार दि.24 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन

 आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी 


राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही यावर्षीच्या स्नेह संमेलनाची उत्सुकता लागली आहे.कारण संमेलन म्हटले की,भरतनाट्यम्, कोळीगीते, विविध गीतांवर आधारीत नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध वेशभूषा सादर करून  शाळेतील विद्यार्थी ‘जल्लोष’ साजरा करतात.

परंतु राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबत आपली संस्कृती आणि वारसा जोपासण्याचे शिकवण देणारे ठरणार आहे. शिक्षणासोबतच मनोरंजनाचे महत्त्व पोदार स्कूलमध्ये टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम, त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमणे हे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले असून एकाच वेळी व्यासपीठावर 100 मुलांचे नृत्य होणार असून भव्य दिव्य असे व्यासपीठ असणार आहे. अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

या संमेलनाला तीन ते चार हजार विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ,आत्मविश्वास वाढवा हा उद्देश समोर ठेवून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*Video News | राजस्थानीज PODAR लर्न स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन | 24 डिसेंबर 2023 रोजी*

🔴👇👇👇🎊🎊🎊👍👍
*https://youtu.be/LYf5cq9P7BU?feature=shared*


*🎭 "नाटय कलेचा जागर" शंभरावे अ.भा. नाट्यसंमेलनातील अनोखी संकल्पना*

🎊🔴👇👇👇🪷🪷🪷👁️‍🗨️😎
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_17.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

PODAR RPLS SHORT News

👇👇👇👇
https://youtube.com/@PodarRplscampusparlivaijnath?feature=shared

PODAR RPLS SHORT News Youtube channel सुरू केले आहे सर्वांनी विनंती आहे की आमच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून आपण आमच्या चॅनल ला subscribe करावे...🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या