Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूलचे शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

 आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी



parti...Night out..



BACHPAN राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित बचपन स्कूलमध्ये दि. 22 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विविध मान्यवरांच्या हस्ते राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेची सहसचिव धीरज बाहेती यांनी केले आहे.

प्रत्येकाच्या जीवनातील सुरुवातीच्या काळामध्ये बालपणामध्ये आपला भक्कम पाया तयार करून, स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थी टिकण्यासाठी, मनोरंजनात्मक शिक्षण, संस्कारक्षम शिक्षण आणि मानसशास्त्रीय गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी, शिस्त लावण्यासाठी शिक्षकांचे महत्त्व नेहमीच अग्रभागी असते.शैक्षणिकदृष्ट्या अभ्यास बरोबरच दैनंदिन व्यवहारातील गोष्टी, मुलांना  नात्यातील सर्व नाते भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मित्र, मैत्रिणी आदी  नाते जोपासताना येणाऱ्या समस्या आणि त्या नात्यातील घट्टपणा टिकून ठेवण्यासाठी लागणारे संस्कार BACHPAN बचपन स्कूलमध्ये यावर्षी रिश्ते थिमच्या माध्यमातून या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर आंबेजोगाई शाळेच्या अध्यक्षh तसेच अस्तित्व महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षh सौ स्वरूपाताई कुलकर्णी यांची उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात शाळेतील 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून वेगवेगळ्या नृत्यापासून ते सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन चिमुकल्यांच्या आदाकारीतून सादर होणार आहे अशी माहिती बचपन शाळेच्या प्राचार्या सौ.दिपा बाहेती यांनी दिली आहे.

राजस्थानी चॅरिटेबल संचलित बचपन  स्कूल ही लहान मुलांच्या l प्राथमिक विद्यार्थ्यांचे जडणघडण, संस्कारक्षम शिक्षण, आणि सर्वांगीण विकासासाठी २०१५ पासून म्हणजेच गेल्या ,९ वर्षापासून परळी शहरामध्ये कार्यरत आहे.

PODAR RPLS SHORT News
👇👇👇👇
https://youtube.com/@PodarRplscampusparlivaijnath?feature=shared

PODAR RPLS SHORT News Youtube channel सुरू केले आहे सर्वांनी विनंती आहे की आमच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून आपण आमच्या चॅनल ला subscribe करावे...🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या