Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलला रेल्वेच्या सिकंदराबाद झोन मुख्य सुरक्षा आयुक्त ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट

आपला ई पेपर /परळी/ प्रतिनिधी





 परळीत पोदार लर्न स्कूल ला सिकंदराबाद झोनच्या मुख्य सुरक्षा आयुक्त आरोमा सिंह ठाकूर यांनी  सदिच्छा भेट दिली

सिकंदराबाद झोन दक्षिण मध्य रेल्वेच्या महानिरीक्षक सह प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अरोमा सिंह ठाकूर (IG-cum-PCSC) ह्या आज परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथच्या दर्शनासाठी परळी येथे आल्या होत्या.त्या दरम्यान राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे त्यांनी भेट दिली. त्या वेळी मुख्य सुरक्षा आयुक्त आरोमा सिंह ठाकूर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून रेल्वे व रेल्वे पोलीस या विषयी माहिती दिली.

त्यांच्या या गौरवस्पद कार्यामुळे आज दि.‌23रोजी राजस्थानी पोदार स्कूल येथे अध्यक्ष चंदुलाल बियाणी ,सचिव बद्रीनारायण बाहेती,सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.अरोमा सिंह ठाकूर या गुणवंत सेवेसाठी भारतीय पोलीस पदक, 2005, 2015 आणि 2023 मध्ये तीन वेळा महासंचालक पदक आणि महाव्यवस्थापक पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्तकर्ते आहेत.

विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून त्यांनी जयपूर येथे काम केले आणि प्रतिनियुक्तीवर रेल्वे स्टाफ कॉलेज, वडोदरा येथे प्राध्यापक, कायदा व्यवस्थापन म्हणून काम केले, जिथे त्यांनी "रेल्वेवरील गुन्हेगारी" या विषयावरील अनुलंब संवाद अभ्यासक्रम तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.ज्यामध्ये रेल्वे, जीआरपी, आरपीएफ आणि अधिकारी. संवाद साधण्यासाठी आणि भारतीय रेल्वेची गुंतागुंत समजून घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका ठरते आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या