आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
दैनिक मराठवाडा साथी च्या दिपावली २०२३ विशेषांकाचे राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
साथी सभागृहात रविवारी (ता.१२) सायंकाळी सात वाजता लक्ष्मी पुजना निमित्त दैनिक मराठवाडा साथी च्या दिपावली २०२३ विशेषांकाचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी संपुर्ण दिपावली विशेषांकाचे अवलोकन केले.
दिपावली विशेषांकाचे ना.मुंडे यांनी कौतुक करूण मी सुरूवाती पासुन वाचक असल्याचे सांगितले. यावेळी ना. मुंडे यांचे स्वागत अभिषेक बियाणी व सुरज बियाणी यांनी केले. यावर्षी च्या अंकात कव्हर स्टोरी असलेल्या विश्वजीत मुंडे यांचे स्वागत ना.धनंजय मुंडे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड, युवा नेते अजय मुंडे, प्रा. विनोद जगतकर, दैनिक मराठवाडा साथी चे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी संपादक सतीश बियाणी, शिवकुमार व्यवहारे, विजय वाकेकर, अभय वाकेकर, डॉ अजीत केंद्रे, प्रशांत तोतला, रज्जाक कच्छी, वैजनाथ बागवाले, कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे, निवासी संपादक प्रकाश चव्हाण, अनिल गायकवाड संतोष जुजगर, प्रकाश वर्मा, संतोष बारटक्के, नरसिंग अनलदास यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शहरातील संपादक, पत्रकार व साथी परिवारातील सदस्य उपस्थित होते. संचलन व आभारप्रदर्शन दत्तात्रय काळे यांनी केले.
Social Plugin